मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा देणारी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर पहिली ग्रामपंचायत ठरली…
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा सरपंच विरकुमार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रामसभेने सर्वानुमते ठराव केला. मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा देणारी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर हि पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सदर ग्रामसभेमध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ नारायण भोसले यांनी सूचक म्हणून हा विषय मांडला. यावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते याला मंजुरी मिळाली. याला अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य विष्णू बबन भोंगळे यांनी दिले. महाराष्ट्रातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी व इतर जातींना मिळालेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याबाबत निवेदन दिले. या निवेदनाची प्रत मंडल अधिकारी (सर्कल) बराडे मॅडम यांनी तहसीलदार यांना दिली.
यावेळी उपसरपंच उदय धाईंजे, माजी सरपंच प्रतापबापू सालगुडे पाटील, पुरंदावडे गावचे उपसरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ उर्फ दादासाहेब पालवे, ज्येष्ठ नेते मुकुंद ओवाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन सुळे पाटी,ल जनसेवा संघटनेचे दादासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते बिटूशेठ नरूटे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत रुपनवर आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Hi, I wanted to know your price.