साळमुख चौक या ठिकाणी रास्ता रोको,ग्रामस्थांनी दिले निवेदन

वेळापुर (बारामती झटका)
साळमुख ता. माळशिरस येथे सकल मराठा समाज यांच्यावतीने साळमुख चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अकलूज-सांगोला व पंढरपूर-सातारा या ठिकाणी असणारी वाहतूक काही काळापुरती बंद ठेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मळोली, शेंडेचींच, फळवणी, काळमवाडी या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते.

यावेळी जालना येथे मराठा समाज बांधव यांच्यावर झालेल्या लाठीचार्ज व मराठा समाज यांना आरक्षण मिळणे बाबत महाराष्ट्र राज्यभरातून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत असून साळमुख चौक या ठिकाणी या गावांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक युवा प्रतिनिधी यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. अनेक वर्षापासून चालू असलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन अपयशी ठरत असून समाजातील घटकामध्ये विष पसरविण्याचे कार्य करीत आहे. अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे व आंदोलने करीत असून त्यावरती आजपर्यंत कोणीही ठोस भूमिका न घेतल्याने हा विषय चिघळू लागला आहे. या आंदोलनावेळी कविराज जाधव व सचिन पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनावेळी ॲड. बाबाराजे कदम, प्रताप जाधव, सचिन जाधव, युवराज सावंत, अनिल शेळके, संजय आवताडे, जोतिराम आवताडे, प्रशांत चव्हाण, हरिभाऊ डोंगरे, अमोल पाटील, शरद भोसले, विश्वास आवताडे त्याच बरोबर तांदुळवाडी येथील उपसरपंच विकास चव्हाण, रवींद्र दुधाट, नामदेव मिले, रणजीत कदम, सर्जेराव चव्हाण, कैलास काकडे, विलास कदम, शिवाजी चव्हाण, बंडू दुधाट आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित युवकांनी वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस यांना निवेदन दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng