ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मेडद गावचे माजी सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

माळशिरस (बारामती झटका)

मेडद, ता. माळशिरस गावचे माजी सरपंच नाथाआबा भानुदास लवटे पाटील यांचे वयाच्या 52 व्या वर्षी बुधवार दि. 27/05/2026 रोजी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आजच राहत्या निवासस्थानात शेजारील शेतामध्ये 05 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांचे पुतणे होते. नाथाआबा यांचा स्वभाव सुसंस्कृत व मनमिळावू होता. त्यांनी अनेक लोकांना सहकार्य केलेले आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सर्वांशी मिळून मिसळून असत. गत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून पंचायत समितीची निवडणूक लढविलेली होती. मेडद गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांचे निस्सिम भक्त होते. त्यांच्या दुःखद निधनाने लवटे पाटील परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. लवटे पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व नाथाआबांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button