मोहिते पाटील यांच्या राजकीय अधोगतीची सुरुवात पंढरपुरातून अजितदादांनी केली, तेथेच देवाभाऊ राजकीय अधोगतीचा शेवट करणार, भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार…

शिवरत्नवरील राजकारण अखेरच्या घटका मोजणार, वसंतनाना देशमुख बळीचा बकरा ठरणार, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील यांचा काळ होता. राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे शिवरत्न वरून हालत होती, असा राजकारणाचा सुवर्णकाळ होता. त्यावेळेस मोहिते पाटील यांच्याकडून अनेकांवर राजकीय अन्याय झालेले होते. त्यापैकी स्वर्गीय अजितदादा पवार होते. त्यांनी अजित ब्रिगेडच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांचा राजकीय किल्ला धक्के देऊन निकामी करण्यास सुरुवात केलेली होती. अशातच 2009 साली विधानसभा मतदारसंघाची फेररचना होऊन माळशिरस तालुका अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सुधाकरपंत परिचारक यांच्या मतदार संघावर तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपली उमेदवारी लाभलेली होती. त्यावेळेस मतदार संघासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना न पटणारी गोष्ट होती. परंतु बोलता येत नव्हते. त्यावेळेस मोहिते पाटील यांच्या राजकीय अधोगतीची सुरुवात पंढरपुरातून अजितदादांनी केलेली आहे. तेथेच सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात मोहिते पाटील यांनी स्वतःच्या घरातील उमेदवार न देता वसंतनाना देशमुख यांना बळीचा बकरा बनवलेला आहे. शिवरत्नवरील राजकारण अखेरच्या घटका मोजत असल्याची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मोहिते पाटील यांच्या राजकीय अधोगतीची सुरुवात पंढरपुरातून अजितदादांनी केलेली आहे, तेथेच देवाभाऊ राजकीय अधोगतीचा शेवट करणार, अशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची राजकीय परिस्थिती करणार असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे…
महाराष्ट्राचे राजकारण वसंतदादा पाटील गटाचे मोहिते पाटील करीत असताना सोलापूर जिल्ह्यावर राजकीय पकड ठेवलेली होती. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देऊन लोकप्रतिनिधींना कितीतरी वेळा अडचणी निर्माण केलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, अशा अनेक जिल्ह्यांच्या संस्थांमध्ये स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन अनेकांना नाहक त्रास दिलेला आहे. आम्ही भोगलं सध्या मोहिते पाटील यांचे राजकारण महाराष्ट्रात सोडा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार होऊन तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले आहे.
मराठा आरक्षणाची मोठी धग होती. त्याचबरोबर अनेक मुद्दे असल्याने लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार होता आले. सध्या शिवरत्न बंगला येथील कोणत्याच मोहिते पाटील यांच्याकडे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक चेअरमन, पंचायत समिती सभापती, अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष, यशवंतनगर सरपंच असे कोणतेच पद नाही. त्यामुळे शिवरत्नवरील राजकारण अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळेच वसंतनाना देशमुख यांना बळीचा बकरा ठरवलेला आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये आहेत. निश्चितपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मोहिते पाटील यांच्या राजकीय अधोगतीची सुरुवात पंढरपुरातून स्वर्गीय अजितदादांनी केलेली होती. तेथेच देवाभाऊ राजकीय अधोगतीचा शेवट करणार यात तीळमात्र शंका नाही. असा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून सूर निघत आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



