मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनतेतील संभ्रम दूर करून भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले…

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनतेतील संभ्रम दूर करून भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचे शनिवार दिनांक 07/03/2025 रोजी खऱ्या अर्थ मनोबल वाढवलेले आहे…
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करावी यासाठी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजप पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिलेली होती. सदरच्या नोटिशीला उत्तर दिलेले होते. भाजपचे सदस्यता अभियान सुरू होते, त्यावेळेस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्य नोंदणी केलेली होती. पक्षीय पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे कार्यालयाकडून अभिनंदन पत्र दिलेले होते. महाराष्ट्रातील कितीतरी कार्यकर्त्यांना 1000 सदस्य नोंदणीबद्दल अभिनंदन चे पत्र प्रदेश कार्यालयाने चंद्रशेखर बावनकुळे यांची डिजिटल स्वाक्षरी असणारे पत्रे पाठवलेली होती. मात्र, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदरच्या पत्राचे भांडवल करून भाजप व प्रदेशाध्यक्ष यांचे राजकीय सलोखा असल्याचे चित्र निर्माण केलेले होते.
विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव यांच्या लग्न समारंभ निमंत्रण पत्रिकेचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे महाराष्ट्र व देशातील नेत्यांना सोशल मीडियावर फोटो व्हायरल केलेले होते. लोकसभेला व विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करूनसुद्धा भाजपच्या नेत्यांची जवळीक आहे, अशी सोशल मीडिया मधून चर्चा कार्यकर्ते करीत होते. देवेंद्रजी फडणवीस यांचे वडील नागपूर येथील नातेवाईक यांच्याकडे कामाला होते, असा अपप्रचार फाजील कार्यकर्ते करीत होते. देवेंद्रजी फडणवीस यांच राजकारण नागपूर येथील नातेवाईक यांच्यामुळे आहे, असाही सुर धरून कार्यकर्ते बरळत होते.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरीसुद्धा कार्यकर्ते निष्ठेने व जोमाने कामाला लागलेले आहेत. माळशिरस तालुक्यात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यता अभियान धुमधडाक्यात व जोरात राबवून उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद दिसून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. जर आज देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असते तर सर्व कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरले असते. भाजपच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लग्नाकडे पाठ फिरवली आहे. खरंच, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनतेतील संभ्रम दूर करून भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.
येणाऱ्या काळात भाजपशी गद्दारी करणाऱ्या लोकप्रतिनिधी नेते व कार्यकर्ते यांना त्यांची जागा दाखवून निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाची ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित दाखवतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षातील तळागाळातील सामान्य व गावगाड्यातील कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.