ताज्या बातम्याराजकारण

“नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न” मुहूर्त ठरला, निमंत्रण धाडले, मंडप सजला, तोरण बांधले, मुहूर्त टळला अशी अवस्था श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची झाली..

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण शुभारंभ व शेतकरी मेळाव्यामध्ये माढा लोकसभेची साखर पेरणी असल्याने कमळाच्या मळ्यात अडथळे…

सदाशिवनगर (बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला उद्योग व्यवसायाला चालना व आर्थिक स्तोत्र निर्माण करणारा व्यापारी ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांच्या जिव्हाळ्याचा असणारा श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर या कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व भव्य शेतकरी मेळावा दि. 28 ऑगस्ट व दि. 07 सप्टेंबर 2023 अशा दोन तारखा जाहीर होऊन सुद्धा भूमिपूजन व शेतकरी मेळावा झालेला नसल्याने “नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न” अशी अवस्था श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची झालेली आहे. भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचा मुहूर्त ठरला, ठरलेल्या मुहूर्तप्रमाणे काही लोकांची नावे वगळून निमंत्रण धाडलेले होते. वरूण राजाचे आगमन होत असल्याने पत्रा शेड मारून मंडप सजला होता. त्यावर तोरण बांधलेले होते मात्र, मुहूर्त टाळला. भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळाव्याचा मुहूर्त का टाळला, याविषयी राजकीय व सहकार क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण शुभारंभ व शेतकरी मेळाव्यामध्ये माढा लोकसभेच्या निवडणुकीची साखर पेरणी असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या मळ्यात अडथळे मोहिते पाटील यांना आलेले असल्याची खुमासदार चर्चा सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व भव्य शेतकरी मेळावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रोटोकॉल न पाळता माढा लोकसभेचे कर्तव्यदक्ष व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर ग्रामीणचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह भाजप बुद्रुक मधील नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसल्यामुळे सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार का ? अशी उलट सुलट चर्चा सुरू होती. नियतीलाच मान्य नसल्याने सदरचा कार्यक्रम कोणत्या कारणाने रद्द झाला, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण कार्यक्रमासाठी माढा लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची नियोजन करण्यासाठी बैठक दोन वेळा तारीख जाहीर करून रद्द करण्यात आलेली होती. नियोजन करण्यासाठी तालुक्यामधील मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते असताना माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या व समर्थक कार्यकर्त्यांना नियोजनासाठी बोलविण्याचा उद्देश कदाचित भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आलेला असावा. सध्या माढा लोकसभा मतदार संघात नरेंद्रजी मोदी, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रस्ते, रेल्वे व इतर विकासकामे करण्याचा सपाटा कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला, माण खटाव मतदार संघातील लोकप्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यावर समाधानी आहेत. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील निरा देवधर रखडलेला प्रकल्प व इंग्रज कालीन असणारा फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील मतदान केलेले व न केलेले सुद्धा समाधानी आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील व समर्थक आणि भाऊकीतील नाईक निंबाळकर व समर्थक वगळता खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. अनेकवेळा समदु:खी मोहिते पाटील व भावकीतील नाईक निंबाळकर एकत्र आलेले मतदार संघातील नेते कार्यकर्ते व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाहिलेले आहे. साखर कारखान्याच्या विस्तारीकरण शुभारंभ व शेतकरी मेळाव्यामध्ये माढा लोकसभेची साखर पेरणी असल्याने कमळाच्या मळ्यात मोहिते पाटील यांना अडथळे आलेले असल्याने माढा लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत जातील का ?, असाही प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे. कार्यक्रम नियतीने रद्द केला, अशी प्रतिक्रिया भाजपच्या बुद्रुक गटातील नेत्यांमधून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort