“पचका रे पचका” भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या माळशिरस दौऱ्यात मोहिते पाटील यांचा झाला “पचका”
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याचे आयोजन मोहिते पाटील यांच्याकडे मात्र, नियोजन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे अशी परिस्थिती पहावयास मिळाली..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माढा लोकसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व माढा लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात दौरा मंगळवार दि. 26/12/2023 रोजी दौरा जाहीर झालेला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याचे आयोजन मोहिते पाटील यांच्याकडे होते. मात्र, सदरच्या दौऱ्याचे नियोजन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याकडे, अशी परिस्थिती पहावयास मिळाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माळशिरस दौऱ्यात मोहिते पाटील यांचा पचका झाला, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा काही दिवसापूर्वी माळशिरस तालुका दौरा जाहीर झालेला होता. सदरच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजनाच्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्द व बुद्रुक गटाच्या दोन वेगवेगळ्या बैठका झालेल्या होत्या. त्यावेळेस अचानक दौरा रद्द झालेला होता. चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी अकलूज येथून फलटणकडे रवाना होणार होते. सदरच्या दौऱ्याच्या वेळी समाज माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया आल्यानंतर सदरचा दौरा रद्द झाला, अशी भारतीय जनता पक्षाच्या गोटात चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कालच्या दौऱ्याची सुरुवात माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण तालुक्यातून होऊन अकलूजवरून सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे रवाना झालेले होते. फलटण तालुक्यातून माळशिरस तालुक्यात नियोजन बैठकीच्या दौऱ्यास येत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लँड क्रूजर गाडीमध्ये बसलेले होते. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सारथ्य खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले होते. माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीत प्रवेश करीत असताना भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष माळशिरस व विद्यमान सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धर्मपुरी गावचे आदर्श माजी सरपंच बाजीराव काटकर व अनेक पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यानंतर नातेपुते येथून शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी व प्रांतिक सदस्य के. के. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष व भावी उपाध्यक्ष दादासाहेब खरात, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या सत्काराचे नियोजन केलेले होते. सदरच्या ठिकाणी पंढरपूर वरून वारकरी संस्थेचे बाल वारकरी यांच्या हरिनाम घोषाच्या समवेत स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये माळशिरस नगरपंचायतीचे काळजीवाहू नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष यांचा सन्मान केला. दोन्हीही ठिकाणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सन्मानाच्या वेळी गाडीतून उतरलेले नव्हते, हे सर्व उपस्थित लोकांनी पाहिलेले आहे. माळशिरसवरून अकलूज येथे वॉरियर्स यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवाना झालेले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली.
माळशिरस तालुक्याच्या आजपर्यंतच्या मोहिते पाटील यांच्या राजकीय इतिहासामध्ये पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री तालुक्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्या गाडीमध्ये बसवले जात होते. मात्र, पहिल्यांदाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियोजनामुळे मोहिते पाटील यांचा मनसुबा धुळीला मिळविलेला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीचे व वॉरियर्स बैठकीचे नियोजन मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिलेले होते. कोअर कमिटीची बैठक कारखाना गेस्ट हाऊस येथे करण्याचे पूर्वनियोजित होते. मात्र, कोअर कमिटीतील सदस्यांनी विरोध करून शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यास भाग पाडले. वॉरियर्स बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात पाढा वाचण्याचे प्रशिक्षण दिलेले होते. मात्र, बुथ यंत्रणांना सक्षम करून देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत केलेले कार्य तळागाळात पोहोचले पाहिजे, यावरच चर्चा झालेली असल्याने प्रशिक्षण दिलेले कार्यकर्ते मुग गिळून गप बसलेले होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना भारतीय जनता पक्षामध्ये बुथवर काम करणारा कार्यकर्ता सुद्धा कोणतेही तिकीट मागू शकतो, असे वक्तव्य केलेले असल्याने माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना एक प्रकारे चपराक दिलेली आहे. मोहिते पाटील परिवारातील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विशेष निमंत्रित सदस्य आहेत. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत, धैर्यशील मोहिते पाटील भाजपचे संघटन सरचिटणीस आहेत, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व अन्य सदस्य यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अशी परिस्थिती असताना प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्यामध्ये मोहिते पाटील यांचा पचका का झाला, याविषयी राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना किंमत दिली जाते इतर पक्षात नेत्यांना किंमत दिली जात नाही, असा फरक असताना धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका टिप्पणी करून भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीला काळीमा फासलेला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये असताना मोहिते पाटील यांच्या मनाप्रमाणे सर्व काही घडत होते. मात्र, भारतीय जनता पक्षामध्ये विचारधारा वेगळी असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माळशिरस तालुक्याच्या दौऱ्याच्या वेळी घडलेल्या नाट्यमय घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या बुद्रुक गटात व विरोधी गटात उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
ventolin us price: Ventolin inhaler – ventolin diskus
ventolin nebules