क्रीडाताज्या बातम्या

पै. माऊली कोकाटे विरुद्ध पै. प्रिन्स कोहली यांच्यात ५ लाख रुपयांसाठी लढत होणार

कन्हेर येथील गोकुळाष्टमीनिमित्त घेण्यात येणाऱ्या मैदानात महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात लढत होणार

कन्हेर (बारामती झटका)

कन्हेर ता. माळशिरस येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन गुरुवार दि. ०७/०९/२०२३ रोजी दुपारी ३ वा. ग्रामपंचायत कन्हेर व समस्त ग्रामस्थ कन्हेर यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदर मैदानात महर्षी जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन शंकरनगर अकलूज यांच्यातर्फे इनाम रुपये ५ लाख रुपयांसाठी हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश दांगट यांचा पठ्ठा पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध इंडियन आर्मी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत होणार होती. परंतु, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील खेळानिमित्त बाहेर देशात गेले असल्याने त्यांच्या ऐवजी पै. प्रिन्स कोहली पंजाब आखाडा व पै. माऊली कोकाटे यांच्यात लढत होणार आहे. सदर मैदानास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना यशवंतनगरचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, लोकप्रिय आमदार राम सातपुते, भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर भेटी देणार आहे.

मामासाहेब पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, उपसभापती यांच्यातर्फे इनाम रुपये २ लाख ५१ हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान संग्राम साळुंखे विरुद्ध हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश दांगट यांचा पठ्ठा पैलवान समीर शेख यांच्यात लढत होणार आहे. भरत बापू माने माजी सरपंच कन्हेर, युवा नेते महादेव वाघमोडे यांच्यातर्फे इनाम रुपये २ लाख रुपयांसाठी गंगावेश तालीम कोल्हापूर, वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा पैलवान कालीचरण सोनलकर विरुद्ध वस्ताद कुस्तीसम्राट अस्लम काझी यांचा पठ्ठा पैलवान मनोज माने यांच्यात लढत होणार आहे. शिवदास दाजी सरगर माजी उपसरपंच यांच्यातर्फे इनाम रुपये १ लाख ५१ हजार रुपयांसाठी वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा पैलवान जमीर मुलाणी विरुद्ध वस्ताद स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान विजय मांडवे यांच्यात लढत होणार आहे. शिवाजी रामचंद्र माने युवा नेते, धनाजी पोपट माने युवा नेते यांच्यातर्फे इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान पवन सरगर विरुद्ध वस्ताद सचिन बनकर यांचा पठ्ठा दादा जाधव यांच्यात लढत होणार आहे. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना कन्हेर यांच्यातर्फे इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी इंडियन आर्मीचा पैलवान पांडुरंग शिंदे विरुद्ध वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा पैलवान आशिष वावरे यांच्यात लढत होणार आहे.

धनाजी काळे माजी सरपंच भांब, सोमा भाऊ जाधव युवा उद्योजक नातेपुते यांच्यातर्फे इनाम रुपये ७५ हजार रुपयांसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा पैलवान नामदेव कोकाटे विरुद्ध इंडियन आर्मीचा पैलवान सोनबा गोंगाणे यांच्यात लढत होणार आहे. भानुदास काळे गुरुजी मा. वि. से. सो. चेअरमन कन्हेर यांच्यातर्फे इनाम रुपये ६० हजार रुपयांसाठी गोकुळ वस्ताद तालीम पुणे यांचा पठ्ठा पैलवान भैय्या डांगे विरुद्ध वस्ताद राजेंद्र शिंदे बेनापुर यांचा पठ्ठा पैलवान अण्णा यमगर यांच्यात लढत होणार आहे. हॉटेल फौजी अँड स्नॅक्स माळशिरस, युवा नेते आप्पासो माने यांच्यातर्फे इनाम रुपये ५० हजार रुपयांसाठी वस्ताद आबा सूळ सातारा यांचा पठ्ठा पैलवान रणजीत राजमाने विरुद्ध वस्ताद कैलासवासी बाजीराव देशमुख यांचा पठ्ठा पैलवान आप्पा वळकुंदे यांच्यात लढत होणार आहे‌ लक्ष्मण तात्या पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, अकलूज यांच्यातर्फे इनाम रुपये ५० हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान बापू झंजे वस्ताद विरुद्ध वस्ताद महालिंग खांडेकर यांचा पठ्ठा पैलवान विजय वाघमोडे यांच्यात लढत होणार आहे. विजय गोरड माजी सरपंच गोरडवाडी यांच्यातर्फे इनाम रुपये ५० हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा गणेश वाघमोडे विरुद्ध वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा पैलवान संकेत वाघमोडे यांच्यात लढत होणार आहे.

या मैदानामध्ये उद्घाटनाची कुस्ती वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा पैलवान बबलू पाटील विरुद्ध वस्ताद तानाजी ठवरे यांचा पठ्ठा पैलवान नामदेव वगरे यांच्यात लढत होणार आहे. तसेच यावेळी कन्हेर गावचे मल्ल पैलवान स्वप्नील सरगर, पैलवान अविश काळे, पैलवान हंसराज बोडरे, पैलवान तुषार ठवरे, पैलवान चैतन्य माने, पैलवान संतोष अर्जुन, पैलवान पृथ्वीराज ठवरे हे देखील कुस्ती खेळणार आहेत. या कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे आणि पैलवान युवराज केचे हे करणार आहेत. तरी जास्तीत जास्त मल्ल, कुस्तीसम्राट, कुस्तीशौकीन आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button