पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांचे हेलिकॉप्टर गिरवीच्या माळरानावर उतरणार निवडणुकीचा राजकीय धुरळा उडणार…

माणदेशाचा मानबिंदू दुष्काळी जनतेचा तारणहार माळशिरस तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी दुष्काळी भागातून प्रचाराचा शुभारंभ….
गिरवी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जया भाऊ यांचा रविवार दि. 02/02/2026 रोजी दुपारी 02 वाजता भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा परिषद मांडवे गटाचे अधिकृत उमेदवार धर्मराज वसंत माने, मांडवे पंचायत समिती गण श्री. राजश्री राहुल रुपनवर, कण्हेर पंचायत समिती गण श्री. आनंदराव नामदेव शेंडगे यांच्या प्रचारार्थ गिरवी येथील जाहीर सभेस माणदेशाचा मानबिंदू दुष्काळी जनतेचा तारणहार माळशिरस तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या प्रलंबित प्राण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी दुष्काळी भागातून प्रचाराचा माळशिरस तालुक्यात शुभारंभ करण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हेलिकॉप्टर गिरवीच्या माळरानावर उतरणार असल्याने निवडणुकीचा राजकीय धुरळा उडणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे..
मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये मांडवे पंचायत समिती गणात मांडवे, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, फडतरी, पिंपरी, कोथळे अशी सहा गावे आहेत. तर कण्हेर पंचायत समिती गणात कण्हेर, रेडे, भांब, गिरवी, इस्लामपूर, जाधववाडी, जळभावी अशा सात गावांचा समावेश आहे.
यामध्ये बरीचशी गावे नीरा देवधरच्या पाण्यापासून अनेक दिवसांपासून वंचित आहेत. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व तत्कालीन पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा सभागृहात व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विधान भवन येथे निरा देवधरच्या पाण्याच्या प्रश्नाविषयी सभागृहांमध्ये दोन्ही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला होता. देशाचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले होते. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. त्यांनीच निरा-देवधर च्या 22 गावाचा पाण्याचा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे. सध्या नीरा देवधरच्या पाण्याची अंतिम टप्प्यात निविदा आलेली आहे. माळशिरस तालुक्यातील काही गावांची निविदेमध्ये नावे आलेली आहेत लवकरच उर्वरित सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याकरता माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विशेष करून निरा देवधरच्या कमांड मधील सर्व गावांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील वंचित गावांपासून प्रचाराची सुरुवात होणार आहे. सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मांडवे जिल्हा परिषद गट, फोंडशिरस जिल्हा परिषद गट, पिलीव जिल्हा परिषद गट व दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये झंजावाती दौरा होऊन प्रचाराच्या जाहीर सभेमुळे माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रमुख पाच पक्ष व अनेक संघटना छोटे-मोठे पक्ष एकत्र येऊन लढत आहेत. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची ताकद नेते व कार्यकर्ते दाखवण्याकरता अहोरात्र झटत आहेत. अशातच पालकमंत्र्यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचे बळ येणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



