शिवामृतचे माजी संचालक व माळी समाजाचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब भुजबळ यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

मोहिते पाटील गटाला मा. आमदार राम सातपुते यांचा दे धक्का, फोंडशिरस जिल्हा परिषद गटात भाजपचा वाढणार मतदानाचा टक्का…
सदाशिवनगर (बारामती झटका)
शिवामृत संघाचे माजी संचालक माळी समाजाचे जेष्ठ नेते आप्पासाहेब भुजबळ यांचा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरदबापू मोरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. संगीताताई मोटे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुन धाईंजे, सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माणिकराव सुळे पाटील, तामशीदवाडीचे माजी उपसरपंच व दूध डेअरीचे चेअरमन गजानन गोरे, मल्हारी भुजबळ, नारायण सालगुडे पाटील, राघू बनसोडे, डॉ. सुळे पाटील, दशरथ बनकर, इंद्रजीत बनकर, ज्ञानदेव बनकर, मनोहर भुजबळ, बलभीम बनकर, दादा पालवे, अमोल धाईंजे, आप्पासाहेब शिंदे, बजरंग कत्ते, सचिन तोरणे, चंद्रकांत तोरणे, प्रकाश भुजबळ, रिपाईचे तालुका सचिव मारुती खांडेकर, युवा नेते मदन सुळे पाटील, योगेश दाभाडे, हनुमंतराव धाईंजे, साईराज सुज्ञे, पोपटराव करे, कैलास पालवे, नितीन सालगुडे पाटील, सुभाष सालगुडे पाटील, विपुल रनवरे, नेताजी धाईंजे, जितेंद्र गुरव, किरण सावंत आदी मान्यवरांसह फोंडशिरस जिल्हा परिषद गटातील व भांबुर्डी पंचायत समिती गणातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे फोंडशिरस जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार हरिदास पाटील व भांबुर्डी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार देविदास पाटील यांना माळी समाजाचे जेष्ठ नेते व शिवामृतचे माजी संचालक आप्पासाहेब भुजबळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झालेला असल्याने निश्चितपणे भाजपच्या मताधिक्यामध्ये वाढ होणार आहे. मोहिते पाटील गटाला माजी आमदार राम सातपुते यांचा दे धक्का फोंडशिरस जिल्हा परिषद गटात भाजपचा वाढणार मतदानाचा टक्का अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



