सदाशिवनगर गावचे माजी सरपंच तानाजी पालवे व माजी उपसरपंच गोरक्षनाथ उर्फ दादा पालवे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

मोहिते पाटील गट व आ. उत्तमराव जानकर गटाला सदाशिवनगर पंचक्रोशीत खिंडार, फोंडशिरस जिल्हा परिषद गटासह भाजपला वाढणार मतदार….
सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला निवासस्थानी आ. उत्तमराव जानकर गटाचे सदाशिवनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच व धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते तानाजी रामहरी पालवे व सदाशिवनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गोरक्षनाथ उर्फ दादा पालवे, पुरंदावडे गावचे ज्येष्ठ नेते बाबुराव नारायण पालवे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे. त्यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य व ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील उर्फ नाना, फोंडशिरस गटातील भांबुर्डी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार देविदास पाटील, पुरंदावडे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह पालवे, अविनाश ओवाळ, आनंदराव सालगुडे पाटील, सागर ओवाळ, दादासाहेब आयवळे, विशाल जठार, मदन सुळे पाटील, मारुती खांडेकर, तानाजी सुरवसे, कैलास पालवे, सचिन पिसे, वैभव सुरवसे, भारत पालवे, शिवतेज पालवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..
सदाशिवनगर गावचे माजी सरपंच व धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते तानाजी रामहरी पालवे यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात जानकर गटाचे अस्तित्व टिकवून ठेवलेले होते. धर्मपत्नी सरपंच होत्या, ते स्वतः उपसरपंच होते. चार वेळा सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सदस्य पदावर होते. सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. भाजप प्रवेशाने जानकर गटाला खिंडार पडलेले आहे.

मोहिते पाटील गटाचे युवा नेतृत्व गोरक्षनाथ उर्फ दादा पालवे यांच्या धर्मपत्नी यांनी सदाशिवनगर ग्रामपंचायत उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. दादा पालवे यांचा जनसंपर्क मोठा आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे.
पुरंदावडे गावचे ज्येष्ठ नेते बापूराव नारायण पालवे यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मोहिते पाटील व जानकर गटाला सदाशिवनगर पंचक्रोशीत खिंडार पडलेले आहे. फोंडशिरस जिल्हा परिषद गटासह भाजपला मतदार वाढणार आहेत. फोंडशिरस जिल्हा परिषद गटात हरिदास पाटील व भांबुर्डी पंचायत समिती गणात देविदास पाटील भाजपचे अधिकृत उमेदवार यांना फायदा होऊन मतदानामध्ये वाढ होणार आहे..




