पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यात हेलिकॉप्टरने माळशिरस तालुका दौरा जाहीर..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात गिरवी येथे हेलिकॉप्टरने दौरा स्वीय सहाय्यक श्री. सूर्यकांत सजगणे यांनी सोमवार दि. 02, फेब्रुवारी,2026 रोजीचा दौरा जाहीर केलेला आहे. त्यांच्या समवेत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे पालकमंत्री महोदय यांच्या समवेत हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार भगवानराव गोरे यांचा जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेस उपस्थित राहण्याचा सातारा व सोलापूर जिल्ह्यात झंजावाती दौरा जाहीर झालेला आहे.

सकाळी बोराटवाडी येथून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात तांबवे पाटण तालुक्यात तळमावले करून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील माऊली लॉन्स, करमाळा तालुक्यातील वीट येथून माळशिरस तालुक्यात गिरवी येथे हेलिकॉप्टरने दुपारी 03 वाजता आगमन होणार असून गिरवी, फोंडशिरस व दहिगाव अशा तीन ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेस उपस्थित राहणार आहेत. रात्री सोयीनुसार मोटारीने कमलकुंज निवासस्थानी रवाना होणार आहे. असा पालकमंत्री यांचा शासकीय दौरा जाहीर झालेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



