पिलीव नागरी आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला…

पिलीव (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला निवासस्थानी पिलीव नागरी आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये उमेश सरवदे, नितीन कपने, बिरुदेव काकडे, सुमित मोरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील, माळशिरस मंडल अध्यक्ष तथा पिलीव गावचे लोकनियुक्त माजी सरपंच नितीन मोहिते, युवा नेते सचिन दादा पडळकर, सचिन भैस, शिवप्रसाद पुकळे, जितेंद्र पाटील, शिवराज पुकळे, गणेश देशमुख, खंडू माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य स्वर्गीय हरिभाऊ कपने याचे चिरंजीव नितीन कपने यांनी यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम केलेले होते. उमेश सरवदे यांच्या भावजय पंचायत समिती निवडणुकीमध्ये 45 मताने पराभव झाला होता. जनमानसातील नागरी आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला असल्याने पिलीव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव व पिलीव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. नम्रता शिवराज पुकळे यांच्या मताधिक्यांमध्ये वाढ होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



