ताज्या बातम्यासामाजिक

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी पोलीस प्रशासनाची मान उंचावली…

महाराष्ट्र पोलीस दलात अकलुज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी….

विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या ०६ गुन्हेगारांना ताब्यात घेवुन १०,४७,००० रु. किंमतीचे १७ अग्निशस्त्रे, ४७ जिवंत कॉडतुसे व ८,०००,०० रु. ची टाटा नेक्सॉन कार असे एकुण १८,४७,००० रुपयांचा माल हस्तगत.

अकलूज (बारामती झटका)

अकलुज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांनी दबंग उल्लेखनीय कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह पकडून जेरबंद केले आहे. यामध्ये विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या ०६ गुन्हेगारांना ताब्यात घेवुन १०,४७,०००/- रु किंमतीचे १७ अग्निशस्त्रे, ४७ जिवंत कॉडतुसे व ८,०००,००/- रु. ची टाटा नेक्सॉन कार असे एकुण १८,४७,०००/- रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे व त्यांच्या दबंग टीमने पोलीस प्रशासनाची मान उंचावेल अशा पद्धतीने उल्लेखनीय दमदार कामगिरी केलेली आहे. अकलूज उपविभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे उपस्थित राहून धडाकेबाज कामगिरीची पत्रकार परिषद झाली त्यावेळी माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेच्या मनामध्ये अकलूज उपविभाग व अकलूज पोलीस स्टेशन यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा हरवलेला आहे..

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. १४/०८/२०२६ रोजी अकलुन पोलीस ठाणेचे पोहेकॉ/१६२३ श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, इसम नामें विकास कैलास वजाळे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर त्याचे वर्णन काळे सावळे रंगाचा, त्याचे चेहऱ्याचे डावे बाजुस कोड असलेला, त्याचे अंगावर पांढरा फुल बाहीचा शर्ट व राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला त्यांचेकडील टाटा कंपनीची नेक्सॉन कार नं एम एच ४५ ए ई ७००२ मधुन विनापरवाना, बेकायदेशीर देशी बनावटीचा कठ्ठा (अग्नीशस्त्र) विक्रीसाठी अकलुन ते टेंभुर्णी जाणारे रोडवर पतंगे मटन हॉटेल, संगम ता. माळशिरस येथे दुपारी ३.०० वा. सुमारास येणार असल्याबाबत माहिती मिळाली. सदरची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल १६२३ श्रीराम पोरे यांनी श्री. संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज व पोलीस निरीक्षक श्री. निरज उबाळे यांना कळविली. त्याप्रमाणे श्री. निरज उबाळे पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे यांनी सदर माहिती वरीष्ठांना कळविली. व अकलुज पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल १५८९ शिवकुमार मदभावी पोलीस कॉन्स्टेबल ५१ जगताप, पोलीस कॉन्स्टेबल ७११ माने देशमुख तसेच नियंत्रण कक्षाकडील पोलीस हेडकॉन्स्टेबल १६५९ अनिल शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ३९६ सुरज हेंबाडे, सहाय्यक पोलीस फौजदार कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल ११४ स्वप्निल गायकवाड यांचे पथक तयार करून दि. १४/०८/२०२६ रोजी इसम नामे विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापूर हा ०२ पिस्टल (अग्नीशस्त्रे) व ०४ जिवंत काडतूसे (राऊण्ड) व वाहनासह मिळून आला आहे. तपासा दरम्यान सहा गुन्हेगार व 17 पिस्तूल (अग्निशस्त्रे) जिवंत काडतुसे (राऊंड) वाहनासह जप्त करून सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाची दमदार कामगिरी केलेली आहे.

या कार्यवाहीचे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे तर बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button