ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक
प्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार वसंत हंकारे सर यांच्या व्याख्यानाचे खुडूस येथील इंग्लिश स्कूलमध्ये आयोजन

खुडूस (बारामती झटका)
कै. सुरज (भाऊ) ठवरे बहुउद्देशीय, सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित न्यू सेमी इंग्लिश स्कूल, खुडूस, ता. माळशिरस येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार वसंत हंकारे सर यांचे ‘न समजलेले आई-बाप समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदरच्या व्याख्यानाचे आयोजन संस्थापक विनायक ठवरे सर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ११/८/२०२६ रोजी सकाळी ९ वा. न्यू सेमी इंग्लिश स्कूल, खुडूस येथे करण्यात आले आहे.

सदरच्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक प्राचार्य अमोल कुलाळ सर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



