प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काळे यांना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने सत्कार
करमाळा (बारामती झटका)
आवळा उत्पादनातून आठ एकरात 43 लाख रुपये उत्पन्न मिळवणारे कामोने, ता. करमाळा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काळे त्यांना महाराष्ट्र शासनाने उद्यान पंडित पुरस्कार जाहीर केला आहे. दोन लाख रुपयांचा चेक राज्यपालांच्या हस्ते बाळासाहेब काळे यांना शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.
प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काळे यांनी जिरायती क्षेत्रावर ठिबक सिंचनद्वारे त्यांनी आठ एकर क्षेत्रावर आवळा पिकाची लागवड केली होती. दुष्काळात पिण्यासाठी पाणी नसणाऱ्या कामोने गावात शेततळ्यामार्फत पाण्याची साठवणूक करून अत्यंत कमी पाण्यात त्यांनी हे उत्पादन घेतले आहे. या त्यांच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी राज्याचे कृषी संचालकाची कमिटी येऊन गेली होती.
आज शिवसेनेच्या कार्यालयात बाळासाहेब काळे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता आवळ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभा करणार असून अजून आजूबाजूचे शेतकऱ्यांना आवळा लावण्यासाठी प्रवृत्त करून शेतकऱ्यांना उत्पादनाचे साधन करून देणार असल्याचा संकल्प यावेळी बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केला.
यासाठी श्री. बाळासाहेब काळे यांना मा. श्री. गवसाने साहेब जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापुर, श्री. शहाजी कदम, उपविभागिय कृषि अधिकारी, कुर्डुवाडी, श्री. चंद्रकांत मंगरूळे, तंत्र अधिकारी, सोलापुर, श्री. संजय वाकडे, तालुका कृषि अधिकारी, करमाळा, श्री. अनिल चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी, करमाळा यांचे वेळोवळी सहकार्य लाभले असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.