प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न झाली…
सदाशिवनगर ( बारामती झटका)
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मंडळाच्या गणपती उत्सवातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना विष्णू कल्याण पवार व सौ. शामल विष्णू पवार या उभयतांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळातील मार्गदर्शक सदाशिवनगरचे माजी सरपंच प्रतापबापू सालगुडे पाटील, दीपक दीक्षित, डॉ. विजयसिंह भगत, सुभाष सुज्ञे उर्फ हरिओम यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष संतोष स्वामी यांच्यासह मंडळातील सदस्य, गणेशभक्त, व्यापारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेश उत्सवाची सुरुवात 35 वर्षापासून झालेली आहे. या मंडळामार्फत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. गेल्या महिन्यामध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या नावाने समाजामध्ये काम करणाऱ्या महिलांना रत्नाई पुरस्काराने सन्मानित केलेले होते. गणेश जयंती व गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो लोकांना अन्नदान केले जाते.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मंडळाला भव्य दिव्य अशी गणेशाची मूर्ती भेट दिलेली आहे. सदरच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते. याही वर्षी उत्साहात व मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना बाळकृष्ण कुलकर्णी, पुरंदावडे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ищите в гугле