ताज्या बातम्यासामाजिक
प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न

कार्यालयीन परिसरात स्वच्छता राखण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन
बारामती (बारामती झटका)
उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यालय प्रमुखाने कार्यालयासोबत परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी, प्रशासकीय भवन परिसरात पाण्याच्या बाटल्या, चहाचे कागदी कप आदी वस्तू टाकू नये, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.
यावेळी उप विभागीय व तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी सर्व परिसर स्वच्छ केला.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



