पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं, तसाच प्रकार माळशिरस तालुक्यातील एमपीएससी ला बहिण-भावाने गंडवलं
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यात एकीकडे वादग्रस्त आयएसआय अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी एमपीएससीच्या बाबतीत माळशिरस तालुक्यातील बहिण-भावांवर गंभीर आरोप केलेले आहेत. पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं तसाच प्रकार एमपीएससीच्या बाबतीत बहीण भावाने गंडवलं आहे. सदरच्या व्यक्ती विरोधात तक्रार केलेली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
दिव्यांग असल्याचे सांगत बहीण आणि भाऊ या दोन अधिकाऱ्यांनी एमपीएससीला गंडवले, असा आरोप वडेट्टीवार यांनी करून सध्या दोघेही दोन जिल्ह्यांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे की, या दोघांनी 80 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. हे प्रमाणपत्र बोगस असून या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवल्याचा वडेट्टीवार यांनी दावा केलेला आहे. या दोघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून सदरच्या बोगस प्रमाणपत्राचा तपास करावा, असे वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रही लिहिलेले आहे.
सरकारकडून काय कार्यवाही होते, हे पाहणे गरजेचे आहे.
सदरच्या बहिण भावांचे नावे बारामती झटका चमू यांच्या हाती आलेली आहेत. मात्र, खात्री करून नावे जाहीर केली जातील. प्राथमिक माहितीमध्ये कर्णबधिर दिव्यांग सर्टिफिकेट मिळवले असल्याची चर्चा सुरू आहे. लहानपणापासून कर्णबधिर नव्हते मात्र, नोकरीच्या वेळी कसे कर्ण शबधिर झाले, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. खरे दिव्यांग बाजूला राहून कृत्रिम बनावट दिव्यांग फायदा घेत आहेत, असेही दिव्यांग समाज बांधव यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back