पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार नोंदणी विशेष अभियान….

श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिषेक पाटील व उपाध्यक्ष करण पाटील यांचा पदवीधरांसाठी अभिनव स्तुत्य उपक्रम….
अकलूज (बारामती झटका)
पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार नोंदणी विशेष अभियानास सुरुवात झाली आहे. पानीव, ता. माळशिरस येथील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिषेक पाटील व उपाध्यक्ष करण पाटील यांनी पदवीधरांसाठी अभिनव स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे.
दि. २४, २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीराम किड्स वेळापूर, दि. २६, २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीराम किड्स संग्राम नगर, दि. २८, २९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीराम सिनेमा अकलूज येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पदवीधर मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

पदवीधर मतदार संघ ही सुशिक्षित आणि प्रगल्भ मतदारांची ओळख आहे. उच्चशिक्षित वर्गांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सर्व पात्र पदवीधर नागरिकांनी या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील निवडणुकांमध्ये केलेली मतदार नोंदणी वैध राहणार नसून सर्व पदवीधर मतदारांनी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.

पदवीधर मतदार नोंदणीकरीता पात्रता :
१) भारताचा नागरिक असावा.
२) मतदार नोंदणीकरिता १ नोव्हेंबर २०२२ पूर्वीचा, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा.
३) सर्वसाधारणपणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यातील रहिवासी असावा.
४) विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५) पदविका (Diploma) जर पदवीतुल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल.
पदवीधर मतदार नोंदणीकरीता आवश्यक कागदपत्रे :
१) पासपोर्ट साईज फोटो. (१)
२) रहिवासाचा पुरावाः आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), पासपोर्ट, लाईट बिल, वाहन परवाना, खरेदी खत, भाडेकरू करारनामा (Rent Agreement), पदवी/पदविकेची प्रत अथवा मार्कलिस्टची (शेवटच्या वर्षाची) प्रत. (यापैकी कोणतेही एक)
३) विवाहित महिलांनी विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, विवाह नोंद पुरावा, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



