राष्ट्रमाता माॕसाहेब जिजाऊ जयंती उत्सवसमिती अध्यक्षपदी राजु पाटील बोंबले

पैठण (बारामती झटका)
१२ जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठया थाटामाटात राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती साजरी केली करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर येथे सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमताने जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी राजु पाटील बोंबले यांची निवड करण्यात आली असून सर्व समाजबांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक नवसंजवनी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये जिजाऊ कन्यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामुळे आईसाहेब जिजाऊ यांची प्रेरणा घरोघरी पोहचण्याचे कार्य होते. – राजु पाटील बोंबले
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.