राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नाशिक (बारामती झटका)
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. देशभरातील विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये चुरशीचे सामने रंगले.
या स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू सफान पठाण याने 10 ते 11 वर्षे वयोगटातील 25 किलो वजनी गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच अकॅडमीची खेळाडू ईश्वरी सम्राट मोरे हिनेही याच 10 ते 11 वर्षे वयोगटातील 25 किलो वजनी गटात उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडविले.

खेळाडूंच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक साहेबराव ओहोळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी तसेच बारामती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



