ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानदेव राऊत यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी..

बनावट खोट्या सह्या करून नकली कागदपत्रे तयार करून बनावट कर्ज उचलून रकमेचा गैरवापर केल्याचा तक्रारदाराचा आरोप….

माळशिरस (बारामती झटका)

रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, राहणार सर्व सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे. भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465 ,468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला आहे.

माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला असून पुण्यामधील मास्टर माईंड रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीसांनी अटक केलेली होती. माळशिरस येथील मेहरबान न्यायालयासमोर उभे केले असता गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्याकरता पाच दिवसाची सोमवार पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विशाल नवले पुढील तपास करीत आहेत.

संस्थेचे चेअरमन व सर्व संचालकासह खाजगी सावकार यांची शोध मोहीम सुरू आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button