रेडे घाट रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार : कार्यतत्पर पाणीदार मा. खा. रणजितसिंह

फलटण (बारामती झटका)
फलटण आणि कोरेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या रेडे घाट रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आळजापूर, (ता. फलटण) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार यांनी ही माहिती दिली अंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील अंतर कमी होऊन परिसरातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.
आळजापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत, रस्ते आणि सभामंडप या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, हिंगणगाव जिल्हा परिषद गट आणि आळजापूर गावातील विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रेडे घाट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून हे काम मार्गी लावले जाईल. तसेच, धोम-बलकवडी आणि नीरा-देवघर जोड प्रकल्प पूर्ण करून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात आमदार सचिन पाटील यांनीही विकासकामांवर भाष्य केले. तालुक्यातील सर्व रस्ते दर्जेदार करण्यावर आपला भर असेल. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
याप्रसंगी प्रल्हादराव साळुंखे पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, विलासराव नलवडे, माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्या किरण नलवडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सीमा भोईटे, सरपंच पुष्पा पवार, उपसरपंच गीतांजली नलवडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



