साखर नाव घेतले की गोडी आठवते, तसंच रामभाऊ नाव घेतलं की कामाचा माणूस समोर दिसतो..

प्रस्थापितांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या विकासकार्याची रेषा पुसू नये, स्वतःची विकासाची रेषा निर्माण करा, सर्वसामान्य जनतेचा सूर..
माळशिरस ( बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकास काय असतो आणि लोकप्रतिनिधी काय करू शकतो, हे कार्यातून दाखवून दिलेले आहे. राम सातपुते यांच्या कार्यावर सर्वसामान्य व गोरगरीब जनता, कार्यकर्ते समाधानी आहेत. प्रस्थापित व त्यांचे बगलबच्चे यांची पोटदुखी सुरू आहे. प्रस्थापितांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या केलेल्या विकासकार्याची रेषा पुसू नये, स्वतःची विकासाची रेषा निर्माण करा, असा सर्वसामान्य जनतेचा सूर येत आहे. ज्याप्रमाणे साखर नाव घेतलं की त्या साखरेची गोडी आठवते तसंच नुसतं रामभाऊ नाव घेतलं की कामाचा माणूस समोर दिसतो, अशी राम सातपुते यांनी कामाचा माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे जनता दरबाराची पहिल्यांदा तालुक्यात सुरुवात केली. त्यामुळे अनेक लोकांना माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहाची ओळख झाली आणि सर्वसामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळालेले होते. अनेकांनी व्यक्तिगत व सार्वजनिक कामांचा निपटारा करून घेतला आहे. मतदार संघामधील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आपल्या आर्थिक अडचणीमुळे अनेक लोकांच्या अवयवांची ऑपरेशन रखडलेली होती. राम सातपुते यांनी देहाचा कोणताच अवयव ऑपरेशन करण्याचा ठेवलेला नाही. त्यामुळे जनतेने रामभाऊ यांना आरोग्यदूत पदवी दिलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात प्रस्थापितांनी विकासापासून अनेक कामे कोसो दूर ठेवलेली होती. रस्ते, लाईट, पूल, इमारती अशांना निधी उपलब्ध करून दिला. कामाचा माणूस म्हणून लोकांमध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे. मोहिते पाटील व जानकर दोन्ही गट एकत्र असताना राम सातपुते यांना एक लाख आठ हजार मतं पडलेली होती. निसटता पराभव झालेला होता, तरीसुद्धा सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी नाळ तुटलेली नाही. सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा सपाटा सुरू आहे.
प्रस्थापितांचे राजकारण भुईसपाट होत चाललेले असल्याने राम सातपुते यांच्यावर टीका टिपणी सुरू आहे. राम सातपुते यांचे टीकाकार त्यांच्याकडे लक्ष न देता सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा विकासाचारथ डोमाने पुढे नेत आहेत. उलट भट्टीमध्ये 24 कॅरेट सोनं तापवून लाल केल्यानंतर जसे उजाळून दिसते, तशाच पद्धतीने प्रस्थापित व त्यांच्या बगलबच्चांनी राम सातपुते यांचा एकेरी उल्लेख व टीका टिप्पणी केल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब जनतेमधून राम सातपुते यांच्याविषयी आत्मियता व प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



