समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांचा जनता दरबार….

पतीच्या पाऊल वाटेवर पत्नीची दैदिप्यमान वाटचाल सुरू…
माळशिरस विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच तत्कालीन आमदार राम सातपुते यांची जनता दरबाराला सुरुवात, तर जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार सुरू करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले होते. आमदार व जनता यामधील दरी कमी करून सर्वसामान्य गरजू लोकांसाठी जनता दरबाराचा उपयोग होऊन अनेकांनी सार्वजनिक व व्यक्तिगत प्रश्न मार्गी लावलेले आहेत. दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी दहिगाव येथील हनुमान मंदिर येथे बुधवार दि. 13/05/2026 रोजी सकाळी आठ वाजता जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. पतीच्या पाऊल वाटेवर पत्नीची दैदीप्यमान वाटचाल सुरू असल्याने जनता दरबाराचे दहिगाव जिल्हा परिषद गटासह माळशिरस तालुक्यामध्ये या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
तत्कालीन दमदार आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराचे महत्त्व सर्वसामान्य व गरजू लोकांना माहिती झालेले आहे. सार्वजनिक व व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक जागच्या जागीच होत असते. यामुळे जनता दरबारात अनेक लोक आपले प्रश्न मार्गी लावून घेत असतात. दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी प्रचारावेळी गटातील वाड्यावस्त्या व गावभेटीमध्ये लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या होत्या. जनतेसाठी जागृत असणाऱ्या व लोकांच्या अडचणी सोडवण्याकरता सदरच्या अडचणीचे निवारण करून व्यक्तिगत जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी लोकांना हक्काचे व्यासपीठ असावे, याकरिता जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. जनता दरबाराचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



