ताज्या बातम्यासामाजिक

सरगरवाडी, कण्हेर गावचे सुपुत्र व भारतमातेचे भुमीपुत्र श्री. लक्ष्मण सरगर यांचा इंडियन आर्मी सेवानिवृत्त सन्मान सोहळा….

सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माळशिरस तालुक्याचे मा. आ. राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजीवनीताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सरगरवाडी, कण्हेर गावचे थोर सुपुत्र व भारतमातेचे भूमिपुत्र श्री. लक्ष्मण महादेव सरगर भारतीय सेना (इंडियन आर्मी) दलामधून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ शनिवार दि. 07/03/2026 रोजी सायंकाळी सात वा. सरगरवाडी, कण्हेर, ता. माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या सेवानिवृत्त समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सौ. संजीवनीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती समारंभ संपन्न होणार आहे.

सरगरवाडी, कण्हेरचे थोर सुपुत्र मेजर लक्ष्मण सरगर यांचा भारतीय सेनेमधून सेवा निवृत्तीच्या निमित्ताने जीवनप्रवास…
सरगरवाडी, कण्हेर येथील प्रगतशील बागायतदार महादेव नामदेव सरगर व केशरबाई महादेव सरगर यांना तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. प्रतिकूल परिस्थितीत महादेव व केशरबाई यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. थोरले बाळासाहेब सरगर भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुका अध्यक्षासह अनेक पदांवर काम केलेले आहे. दोन नंबरचे बंधू रामदास सरगर प्रगतशील बागायतदार म्हणून नावाजलेले आहेत. बहीण छाया यांचा माळशिरस येथील तरडे परिवारामध्ये नागेश तरडे यांच्याशी विवाह झाला आहे.

श्री. लक्ष्मण सरगर यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा सरगरवाडी येथे झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण सयाजीराव गायकवाड विद्यालय सातारा व सातवी ते दहावी हे शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, मानकी येथे झाले. तर पदवीपर्यंतचे शिक्षण मुधोजी महाविद्यालय, फलटण या ठिकाणी झाले. त्यांची फेब्रुवारी 2002 मध्ये आर्मीमध्ये भरती झाली. त्यांची जॉईनींग सिकंदराबाद या ठिकाणी टेक्निशियन ट्रेड म्हणून भरती झाली. त्यावेळी सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सैनिकी कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. 2005 ते 2007 कपूरथला पंजाब या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आला.

त्यानंतर पानागड, पश्चिम बंगाल या ठिकाणी दोन वर्ष नोकरी होती. 2011 बाडमेर, राजस्थान पाकिस्तान बॉण्ड्री वरती एक वर्ष, पुढील दोन वर्षे आयोध्या उत्तर प्रदेश, नंतर एक जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 शांती सैनिक म्हणून दक्षिण आफ्रिका कांगो या ठिकाणी होते. पुन्हा भारतामध्ये ताशिंगी लदाख ग्लेशियर या ठिकाणी एक वर्ष, 2019 ते 2021 दोन वर्षे नवी दिल्ली आर्मी हेडक्वार्टर मध्ये टेक्निकल हेडक्वार्टर म्हणून जॉब होता. 2022 ते 2024 डीआरडीओ म्हणून हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी जॉब होता. 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी शेवटचा समारोप झाला.

त्यांना DGEME अवार्ड दोन वेळा, material service middle उत्कृष्ट सेवा पदक मिळालं होतं. विविध ठिकाणी देशाची सेवा इमाने इतबारे केलेली आहे. भारत मातेच्या देश सेवेमध्ये सुरुवात करीत असताना मातोश्री सौ. केशरबाई सरगर यांना पाहता आले नाही. त्यांचा 2005 साली मृत्यू झालेला आहे. स्वतःच्या आईप्रमाणे भारत मातेची सेवा करणारे श्री. लक्ष्मण सरगर फेब्रुवारी अखेर रिटायर झाल्याने 7 मार्च रोजी सरगरवाडी, कण्हेर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button