ताज्या बातम्यासामाजिक

सावकारकीचा पिसेवाडी येथील निवृत्ती विष्णू पिसे यांच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

वेळापूर (बारामती झटका)

पिसेवाडी ता. माळशिरस येथील मल्हारी खंडू पिसे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून वेळापूर पोलीस स्टेशन येथे निवृत्ती विष्णू भिसे व त्यांच्या मातोश्री यांच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1980 कलम 327, 323, 504, 506, 34 महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 कलम 39 व 45 गुन्हा नोंद झालेला आहे.

मल्हारी खंडू पिसे यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीमध्ये गावातीलच निवृत्ती विष्णू पिसे यांच्याकडून 2019 साली एक लाख रुपये जागा खरेदी घेण्यासाठी दहा टक्के व्याजाने घेतलेले होते. त्यापैकी 50 हजार रुपये नोव्हेंबर 2022 मध्ये परत केलेले होते. राहिलेले 50 हजार रुपयेसाठी तगादा लावलेला असल्याने वारंवार वादविवाद होत होते. माझा मुलगा सुरज हा कामावर जात असताना मराठी शाळेजवळ माझ्या मुलास व्याजाचे पैसे दे नाहीतर मी तुझा मोबाईल घेऊन जातो, असे म्हणून माझ्या मुलाला थप्पड दिली व दमदाटी करून ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले. लहान मुलगा कुणाल हा सकाळी नऊ वाजता कामावर जात असताना निवृत्ती विष्णू पिसे याने घरासमोरील रोडवर माझ्या मुलाकडे व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला व त्यास मोबाईल मागण्यास गेले असता माझे पैसे दे त्याचवेळी मोबाईल देईन असे सांगितले.

रात्री जेवण करून झोपायला लागलो, तेव्हा निवृत्ती विष्णू पिसे व त्यांची आई असे दोघेजण आमचे घरी आले व विष्णू यांच्या मातोश्री यांनी माझ्या मुलाचे तीन वर्षांपूर्वी व्याजाने घेतलेले पैसे कधी देतो असे म्हणाल्या. मी त्यांना काल तुम्ही तुमचे मित्र देविदास श्रीरंग पिसे, राजू दिगंबर पिसे यांना सोबत घेऊन या व पैसे घेऊन जा, असे निवृत्ती पिसे याला सांगितले होते. परंतु, काल पैसे घेण्यासाठी आले नाहीत. ते पैसे सोमनाथ बागाव यांच्याकडे दिले असे म्हणालो असता निवृत्ती पिसे यांच्या मातोश्री यांनी माझे पैसे आत्ताच दे मला व माझ्या पत्नीला शिवीगाळ करू लागल्या. माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगत असतानाच निवृत्ती विष्णू पिसे यांनी त्यांच्या पायातील चप्पल काढून माझ्या मानेवर व डाव्या हातावर मारण्यास सुरुवात केली. त्यावेळेस माझी पत्नी आमची भांडण सोडवण्यासाठी आली असता निवृत्ती यांच्या मातोश्री यांनी माझ्या पत्नीस ढकलून देऊन हाताने लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आमच्या भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेला दादा महादेव म्हेत्रे पिसेवाडी यांनी आमची भांडणे सोडविली. त्यानंतर ते निघून गेले मी व माझ्या पत्नीला घेऊन पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्याकरता आलो आहे. अशी फिर्याद दाखल केलेली आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल 882 नागरगोजे पोलीस ठाणे अंमलदार यांनी सदरचा तक्रारी अर्ज घेऊन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर व्यक्तींवर वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील उपचार चालू आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
14:28