Uncategorized

आ. रणजीतदादा यांना कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापन अबाधित राखून मोहिते पाटील समर्थकांनी वाढदिवसाची भेट दिली…

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील “चाणक्य” धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्व पक्षाचा “करेक्ट” कार्यक्रम केला.

अकलूज (बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाचे 18 पैकी 17 सदस्य निवडून येऊन स्थापनेपासून असणारी सत्ता अबाधित राखून मोहिते पाटील समर्थकांनी विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना एक प्रकारे पाच मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त मोहिते पाटील समर्थक नेते व कार्यकर्ते यांनी वाढदिवसाची भेट दिलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील चाणक्य असणारे भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, भाजप बुद्रुक, शिवसेना युवा सेना सर्व पक्षाचा “करेक्ट” कार्यक्रम केलेला आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी निवडणूक चुरशीची व रंगतदार झालेली होती. त्यामध्ये श्री. विजयसिंह मोहिते पाटील विकास पॅनलच्या 17 जागा तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलची एक जागा निवडून आलेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी सत्तेचा गड कायम राखलेला आहे. त्यामध्ये विजयाचे किंगमेकरची भूमिका शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणनीती आखून विजयामध्ये धैर्यशील यांचा सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने व माळशिरस तालुक्यातील शिवरत्नवरील मोहिते पाटील समर्थक यांच्या सहकार्याने भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचूक नियोजन व राजकीय रणनीती आखून माळशिरस तालुक्यातील सर्व विरोधक व सर्व पक्षांचा “करेक्ट” कार्यक्रम केलेला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवरत्न बाजार शेजारील संपर्क कार्यालयात बसून माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातील नेते व कार्यकर्ते यांच्या संपर्कात राहून राजकीय रणनीती व धूर्त राजकारणाने सर्व कार्यक्रम राबविलेला होता. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधी असणारे राजकीय पक्षांचे जोडे बाजूला काढून एकत्र येऊन माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलची स्थापना केलेली होती. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच चुरशीची व रंगतदार निवडणूक लागलेली होती. निकाल धक्कादायक लागतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत होते. परंतु, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत सहकारी सेवा संस्थेमध्ये केलेले भरीव कार्य व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात केंद्रातून व राज्यातून विकास कामांसाठी निधी आणलेला या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन राजकारणातील चाणक्य असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासू सहकारी यांच्या मदतीने निवडणुकीची रणनीती आखून सर्व विरोधी नेत्यांचा व पक्षांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort