शिवशंभू चरित्र कथाकार ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे तांबवे सातारा यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांचा सन्मान संपन्न झाला..

छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती पिलीव जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न…
मळोली (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती महोत्सव 2026 आयोजित कार्यक्रमात शिवशंभो चरित्र कथाकार ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे तांबवे, सातारा यांच्या शुभहस्ते पिलीव जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांचा सन्मान करण्यात आला..

मळोली, ता. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमामध्ये बुधवार दि. 18/02/2026 रोजी सायंकाळी 07 ते 09 या वेळेमध्ये शिवशंभू चरित्र कथाकार ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे तांबवे, सातारा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमात मळोली ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांच्या सत्काराचे आयोजन केलेले होते. उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती मळोली गावचे थोर सुपुत्र पिलीव जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी मळोली पंचक्रोशीतील हरिभक्त व शिवभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



