सिंहांच्या बुडाला राजकारणातील जय-वीरू जोडीच्या फोटोने लागली आग, मात्र राजकीय वातावरण तापल्याने कोल्ह्याची कुई.. कुई… व कुत्र्यांचा भो… भो… वाढला…
क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा राजकारणातील जय-वीरू यांचा फलकावरील फोटो विरोधकांच्या डोळ्यात सलत आहे…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रात सातारा जिल्हा क्रांतिकारी जिल्हा म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून इतिहासात नोंद आहे. सातारा जिल्ह्यातील माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकारणातील जय आणि वीरू अशी जोडी असलेला फोटो अनेक बॅनरवर माळशिरस तालुक्यात झळकत आहे. फलकावरील फोटो विरोधकांच्या डोळ्यात सलत आहे. सिंहांच्या बुडाला राजकारणातील जय-वीरू जोडीच्या फोटोने आग लागलेली आहे मात्र, राजकीय वातावरण तापल्याने कोल्ह्याची कुई… कुई… व कुत्र्यांचा भो…भो… वाढला असल्याची चर्चा सत्ताधारी गटांमध्ये खुमासदारपणे सुरू आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघाने माढा लोकसभेचे तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींनी खासदार आणि आमदार मतदार संघासाठी काय करू शकतो, याची चुनुक दाखवलेली आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या मुस्कटदाबी व एकाधिकारशाहीला दोघांनी सुरुंग लावलेला होता. त्यामुळे प्रस्थापितांचा जळफळाट दोघांच्या बाबतीत सुरू होता. लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणे, मराठा आरक्षण, महागाई, फोडाफोडी अशा अनेक राजकीय स्टंटबाजीचा महाविकास आघाडीने बाजार मांडून लोकसभेवेळी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये नीरा-देवधर प्रकल्प व लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेच्या प्रश्नाबरोबर इतर मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक व रस्त्यांचा विकास करूनदेखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी खोट्या नॅरिटीव्हची उकल करून ते निवडणुकीला सामोरे गेलेले होते. माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विरोधात तीन पिढ्यांचे राजकारण व उमेदवारांचे तीस वर्षाचे राजकारण असे दोन गट एकत्र येऊन सुद्धा एक लाख आठ हजाराच्या पुढे मताधिक्य लोकप्रिय दमदार राम सातपुते यांना मिळालेले होते. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन क्रांतिकारी असणारा सातारा जिल्हा यामध्ये नामदार शंभूराजे देसाई, नामदार शिवेंद्रराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, नामदार मकरंद पाटील अशा चार लोकप्रतिनिधींना कॅबिनेट मंत्री पदावर घेतलेले आहे. त्याच क्रांतिकारी जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यालगत असणारा विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केलेले दुष्काळी जनतेचे तारणहार ना. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री पदाची जबाबदारी देऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नियुक्ती केलेली आहे.
सातारा व सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या अभिनंदनाचे फलक लागलेले पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर येथे पालकमंत्री पदाची आढावा बैठक घेण्याकरता शिखर शिंगणापूर येथील महादेवास अभिषेक करून माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीपासून नातेपुते, माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी श्रीराम बंगला मांडवे, माळशिरस, वेळापूर अशा ठिकाणी सन्मानाचे जंगी स्वागत केलेले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची आठवण जयकुमार गोरे यांच्या स्वागत समारंभाच्या वेळी झालेली होती. जयकुमार गोरे यांचे माळशिरस तालुक्यात अनेक गावांमध्ये डिजिटल फलक झळकत आहेत. अकलूज येथे समाजकंटकांनी राजकीय सूडबुद्धीने फलक फाडलेला होता. त्यामुळे अकलूज, माळेवाडी, यशवंतनगर, आनंदनगर, बागेवाडी व माळीनगर परिसरातील अभिनंदनाचे फलक लक्ष वेधून घेत आहेत. अकलूज व इतर ठिकाणीही राजकारणातील जय वीरू असणारी जोडी रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्या डिजिटल वरील फोटो येणा-जाणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रस्थापितांनी आजपर्यंत स्वतःचेच डिजिटल पाहिलेले आहेत त्यामुळे दुसऱ्यांचे डिजिटल पाहून राजकीय षडयंत्र रचले जात आहे. मात्र, त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जय-वीरू सक्षम आहेत. असा फोटो डिजिटलवर लावून कार्यकर्त्यांनी प्रस्थापितांना एक प्रकारे चपराक दिलेली आहे. त्यामुळे सिंहांच्या शिकारीतून जगत असणारे कोल्हे, कुत्रे यांची उपासमार होत असल्याने जरी सिंहांच्या बुडाला आग लागली असली तरी, राजकीय वातावरण तापल्याने कोल्ह्याची कुई… कुई… व कुत्र्यांचा भो..भो… वाढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.
लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या जनतेची केलेली सेवा, रुग्णांचा घेतलेला आशीर्वाद व पन्नास वर्षांमध्ये रखडलेला विकास केलेला असल्याने राम सातपुते यांच्यावर टीका सुरू आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार होते. भविष्यात विधान परिषदेवर जातील, राज्याच्या मंत्रिमंडळात जातील, केंद्राच्या मंत्रिमंडळात जातील, हा चढता राजकीय प्रवास आहे. राम सातपुते यांचे बीड जिल्ह्यातील डोईठाण जन्मगाव असले तरीसुद्धा कर्मभूमी माळशिरस तालुकाच राहणार आहे, हे प्रस्थापितांनी व बगलबच्चांनी ध्यानात ठेवावे, असे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.