पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा दोन दिवसाचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर
सोलापूर (बारामती झटका)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे होणार आहे.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी सोयीनुसार पुण्याहून सोलापूरला आगमन व मुक्काम राहणार आहे. रविवार दि. २६ जानेवारी रोजी स. ९.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून शासकीय वाहनाने पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर कवायत मैदानाकडे कडे प्रयाण, स. ९.१० वा. पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर, कवायत मैदान येथे आगमन व ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, स. १०.२५ वा. पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर, कवायत मैदान येथून सात रस्ता सोलापूरकडे प्रयाण, स. १०.३० वा. सातरस्ता, सोलापूर येथे आगमन व सोलापूर महानगरपालिका यांचे पेट्रोल पंपाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, स. १०.५५ वा. सातरस्ता, सोलापूर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूर कडे प्रयाण., स. ११.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, दु. १२.३० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून शासकीय वाहनाने म्हसवड ता. माण जि. सातारा कडे प्रयाण करून दिवसभर सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम कार्यक्रमास उपस्थित राहून संध्याकाळी बोराटवाडी येथे आगमन राखीव व मुक्काम होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.