ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत जाधव यांचा शिंदेवाडी येथे शिंदे परिवारांच्या वतीने सन्मान संपन्न झाला….

पिलीव जिल्हा परिषद गटात दैदीप्यमान यश संपादन व जिल्हा परिषद शिक्षण समितीवर नियुक्ती…

शिंदेवाडी (बारामती झटका)

पिलीव जिल्हा परिषद गटात दैदीप्यमान यश संपादन करून जिल्हा परिषद शिक्षण समितीवर नवनियुक्त सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शिंदेवाडी, ता. माळशिरस येथील शिंदे परिवार यांच्या वतीने श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांचा सन्मान संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत शिंदे, कोमल शिंदे, रतन शिंदे, चंद्रकांत जाधव, दिलीप गुलाबराव शिंदे, रेश्मा शिंदे, मेघा शिंदे जाधव, जीवन शिंदे, सचिन शिंदे, भूषण शिंदे, जावई बापूराव जाधव, देवांश शिंदे आणि इशा शिंदे परिवारांसह डॉ. बाळकृष्ण घोरपडे, सुनीलआबा जाधव, प्रगतशील बागायतदार बापूराव जाधव, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदेवाडी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून नवनियुक्त सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांचा शिंदे परिवार यांच्या वतीने सत्कार व मनपसंत भोजनाचे आयोजन केलेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button