सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प विशाल महाराज खोले, रामायणाचार्य भागवताचार्य ह. भ. प. समाधान महाराज शर्मा आणि ह. भ. प. गुरुवर्य रामभाऊ बप्पा महाराज निंबाळकर यांचे बिटरगाव (सांगवी) येथे सुश्राव्य कीर्तन होणार

वै. ह. भ. प. हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्री संदेह-हरण ग्रंथ पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बिटरगाव (बारामती झटका)
वैकुंठवासी ह. भ. प. हरिदास (नाना) परशुराम डोंगरे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्री संदेह-हरण ग्रंथ पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि. २/५/२०२६ ते सोमवार दि. ४/५/२०२६ रोजी बिटरगाव (सांगवी), ता. करमाळा येथे करण्यात आले आहे.
शनिवार दि. २/५/२०२६ रोजी रात्री ८ ते १० वा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, जळगाव यांच सुश्राव्य किर्तन होणार आहे. रविवार दि. ३/५/२०२६ रोजी रात्री ८ ते १० वा. रामायणाचार्य भागवताचार्य ह. भ. प समाधान महाराज शर्मा केज, ता. बीड यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दि. ४/५/२०२६ रोजी सकाळी १० ते १२ संत स्वामी रघुराज महाराज यांचे नववे वंशज ह. भ. प गुरुवर्य रामभाऊ (बप्पा) महाराज निंबाळकर श्रीक्षेत्र बिटरगाव यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या सप्ताहात सकाळी ४ ते ६ वा. काकडा, सकाळी ८ ते १२ वा. संदेह हरण पारायण, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ व रात्री ८ ते १० वा. किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. श्री संत भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था जवळाला, ता. पाटोदा यांचा दररोज काकडा व हरिपाठ होणार आहे. शनिवार दि. २/५/२०२६ रोजी सकाळी ७ वा. ग्रंथपूजन, विणापूजन व ध्वजपूजन होऊन संदेह हरण ग्रंथ पारायण सुरू होईल. यावेळी ह. भ. प. गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर बिटरगाव, ह. भ. प. अण्णा महाराज निंबाळकर बिटरगाव, भागवताचार्य ह. भ. प. अनिरूद्ध महाराज निंबाळकर, बिटरगाव आणि ह. भ. प. अण्णा महाराज तुकाराम निंबाळकर बिटरगाव हे व्यासपीठ चालक म्हणून असणार आहेत.

तसेच सोमवार दि. ४/५/२०२६ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत चाकण ब्लड बँक यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा बिटरगाव, ता. परांडा येथे करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तीपत्रक व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तरी वैकुंठवासी ह. भ. प. हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. दत्तात्रय हरिदास डोंगरे पाटील, श्री. शिवाजी हरिदास डोंगरे पाटील, श्री. महेश हरिदास डोंगरे पाटील (राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा, तथा संस्थापक अध्यक्ष छत्रपती मराठा सेना महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



