तालुक्यातील तळागाळातील मराठा बांधवांना उद्योजक बनवणे हेच आमचे लक्ष – जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण

हुन्नूर व सूर्यवंशीवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ या शाखेचे उद्घाटन दिमाखात संपन्न
पंढरपूर (बारामती झटका)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ मंगळवेढा तालुक्यातील तळागाळातील मराठा बांधवांना मिळवून त्यांना मराठा उद्योजक बनवणे हेच आमचे लक्ष असल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी सूर्यवंशीवाडी व हुन्नूर, ता. मंगळवेढा येथील उपस्थितांना केले. शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी रोजी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर व सूर्यवंशीवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ या शाखेचे उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, पंचायत समिती सदस्य डॉ. आप्पासाहेब निकम, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, जिल्हा सहसचिव विलास देटे सर, तालुकाध्यक्ष सचिन डोरले, शहराध्यक्ष अमोल सातपुते, युवक शहराध्यक्ष अण्णा ओमने, माजी सरपंच मच्छिंद्र खताळ, मानेवाडीचे सरपंच सिद्धेश्वर मेटकरी, दत्तआश्रम मठाचे मठाधिपती होनमोरे महाराज, रावसाहेब कोरे, आनंद लवटे, विकास पुजारी, राजाराम बुरुंगले, बाळूमामा माने, पुजारी नितीन गायकवाड, युवक नेते प्रताप सूर्यवंशी, हुन्नूर शाखाध्यक्ष दत्ता माने, उपाध्यक्ष धनाजी माने, सूर्यवंशी वाडी शाखाध्यक्ष अमोल सूर्यवंशी, उपाध्यक्ष अनिकेत सूर्यवंशी, तसेच इतर सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुढे आपले मनोगत व्यक्त करताना, जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 साली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील साहेब यांची निवड केली. व त्यांच्या आदेशाने तळागाळातील शेवटच्या मराठा बांधवांपर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यायचा असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी दिला असून मराठा बांधवांना अधिक उद्योजक बनवण्यापासून आता कोणी रोखणार नसल्याचे सांगितले.

पुढे महामंडळाबाबत माहिती देताना सांगितले की, महामंडळाकडे मंगळवेढा तालुक्यातील 1277 इतकी कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत 861 लाभार्थ्यांना बँक प्रकरण मंजूर झाली आहेत. 87 कोटी 61 लाख रुपये महामंडळाकडून वाटप करण्यात आलेले आहेत. महामंडळाकडून 9 कोटी 80 लाख रुपये व्याज परतावा लाभार्थ्यांना मिळालेला आहे. येणाऱ्या काळात मराठा बांधवांनी एकत्र येण्याची गरज असून, आता या पुढील ध्येय महाराष्ट्रामध्ये पाच लाख युवक उद्योजक बनवणे हे असून समाज बांधव उद्योजक बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



