दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव तलावाला द्यावे

पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका स्मिता आदित्य फत्तेपूरकर यांनी मुख्याधिकारी यांना तुळशी वृंदावन यमाई तलावाचे नूतन नामकरण करण्याबाबत निवेदन दिले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक किंवा त्यांनी मदत केलेल्या विकासकामांना लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती तुळशी उद्यान नाव देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री, लोकनेते मा. अजितदादा पवार साहेब यांचे पंढरपूरच्या विकासामध्ये खूप मोठे योगदान होते. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समस्त पंढरपूरकरांची भावना आहे. त्यांचे भव्य स्मारक अथवा त्यांनी मदत केलेल्या विकासकामांस त्यांचे नाव देवून ते कायम स्मरणात ठेवण्याचे भाग्य पंढरपूरकरांना लाभो. तसेच सदरचे तुळशी वृंदावन हे प्रभाग क्र. १५ या माझ्या वॉर्डमध्ये येत असल्या कारणाने तुळशी वृंदावन येथील बागेस लोकनेते स्व. अजितदादा पवार स्मृती तुळशी उद्यान असे नामकरण करण्यात यावे, ही आपणास कळकळीची विनंती.
संबंधित ठराव सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



