ताज्या बातम्यासामाजिक

तांबवे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी

तांबवे (बारामती झटका)

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे जयंतीनिमित्त तांबवे ता. माळशिरस येथिल ओम श्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान व सहकार रत्न वासुदेव कुलकर्णी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य मारुती लोंढे व पंचायत समिती सदस्या ऋतुजाताई पराडे पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमा पुजन दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे सदस्य राम ढोबळे यांना देण्यात आले “आपला माणुस आपल्या गावचा अभिमान” या उक्तीनुसार सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे ओम श्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान व सहकार रत्न वासुदेव कुलकर्णी यांचे संयुक्त विद्यमाने “श्री गोरखनाथ सेवा रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारात ट्राॅफी, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे होते. यावेळी शहाजी बर्वे (भाऊसाहेब) यांनी शासकीय सेवेत 27 वर्षे सेवेत तलाठी पदाबरोबरच कालबद्ध पदोन्नतीत नायब तहसीलदार म्हणून देखील सेवा केली. तसेच पांडुरंग कोळेकर यांनी राहूरी कृषि विद्यापीठात 38 वर्षे प्राध्यापकाचे उत्कृष्ट काम करताना त्यांना दिल्ली फार्मींग पुरस्कार प्राप्त आहे.

ज्ञानदेव कोरे यांनी शिक्षक म्हणून 33 वर्षे शिवाजी शिक्षण संस्था बावडा येथिल सेवेत गणित विषयात आदर्श शिक्षक म्हणून काम केले. लालासाहेब कोळेकर यांनीही शिक्षक म्हणून 25 वर्षे अहिल्या शिक्षण संस्था सांगली शाखा खुडूस येथे सेवा पार पाडली. नामदेव चव्हाण यांनी 41 वर्षे व भारत साठे यांनी 39 वर्षे सिक्युरिटीज ऑफीसर म्हणून दि. सा. मा. शु. फॅ. माळीनगर येथे सेवा केली. मधुकर बर्वे सर यांनी 22 वर्षे माळशिरस प्रशाला माळशिरस येथे क्रीडा शिक्षकाचे कार्यात कुस्तीत विद्यार्थी राज्यस्तरीय पर्यंतचे काम केले. तसेच आशा कवठेकर उत्कृष्ट लेखिका अनुवादीका आणि संपादीका क्षेत्रातील 15 वर्षे कार्यात 16 पुस्तकांचे उत्कृष्ट अनुवादन केले. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अनुवादक म्हणून पुरस्कार प्राप्त आहे. त्या तांबवे गावच्या सुपुत्री असल्याने त्यांनाही श्री गोरखनाथ सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद कुलकर्णी यांनी ओम श्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान ची रजिस्टर्ड स्थापना 2018 साली झाली. हे लावलेले रोपटे बाळसे धरु लागले आहे. प्रतिष्ठानने श्री काळभैरवनाथ व श्री भगवान दत्तात्रय मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू असुन त्यास सढळ हाताने मदतीचे अवाहन केले. सहकार रत्न वासुदेव कुलकर्णी यांनी सहकारी सोसायटीचे 39 वर्षे विझोरी, ता. माळशिरस येथिल सेवाकाळात तेथिल सोसायटी बरोबरच ग्रामपंचायत देखिल ग्रामस्थांच्या सहभागातून बिनविरोध करण्यात यशस्वी झाले होते. जिल्हा व तालूका गटसचिव, पतसंस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केल्याचे प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पांडुरंग कोळेकर सर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जिवनपट सांगून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन गावातील एकोपा जपणारा असा आहे. यावेळी त्यांनी प्रमुख पाहुण्यांनी गावातील पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणेबाबत सुचविले. यावेळी लेखिका अनुवादिका आशा कवठेकर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विषयीचा इतिहास त्यांनी मांडला. यावेळी भावूक स्वरात सांगितले की, मला अनेक पुरस्कार मिळाले महाराष्ट्र शासनाचाही पुरस्कार मिळाला त्याचा आनंद आहेच. परंतु, हा श्री गोरखनाथ सेवा रत्न हा पुरस्कार माझ्या जन्मभूमीतील आहे. त्यामुळे याचा आम्हा पुरस्कार प्राप्त झालेल्यांसाठी वेगळ्याच गगनात न मावणारा आनंद आहे, अशी भावना व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रतिष्ठान चे ट्रस्टी दादासाहेब महाराज यांचे मार्गदर्शनात पोपट नरुटे, लालासो चव्हाण, दादासाहेब चव्हाण, राहूल जाधव, आप्पासाहेब साठे, नवनाथ जाधव, ऋषिकेश देशमाने, सुर्यकांत भोसले, ॲड. कदम, तेजस कोळेकर, सतिश कोळेकर, हणमंत कोळेकर, कानिफनाथ लवटे, कुंभार सर तसेच बहूसंखेने महिलावर्ग व प्रतिष्ठानचे सर्वांनीच मोलाचे योगदान कार्यक्रमास दिले. सदर कार्यक्रमाचे आभार सुर्यकांत इनामदार यांनी मानले.

यावेळी पंचायत समिती सदस्या ऋतुजाताई पराडे पाटील यांनी गावकऱ्यांनी संधी दिल्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचा योग मला आला. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असुन गावातील समस्यांसाठी आपल्या सुचनांप्रमाने कटिबद्ध राहू, असे मत व्यक्त केले. तर जि. प. सदस्य मारुती लोंढे यांनी गावकऱ्यांचे आभार मानत पाणी प्रश्नासाठी मी स्वतः एक पाऊल पुढे राहून आपण प्रश्न मार्गी लावू असे मत व्यक्त केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button