ताज्या बातम्याराजकारण

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ सदस्यांसह अपक्षाचा राजेंद्र राऊतांना पाठिंबा

पंढरपूर (बारामती झटका)

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नऊ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांसह एका अपक्ष सदस्याने भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या १२ पैकी ९ सदस्यांनी राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला समर्थन व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधत सर्व सदस्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस आमदार समाधान अवताडे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रशांत गीड्डे, संतोष सुळे, श्याम गोगाव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक नागेशकाका भोसले, प्रसादभैय्या कळसे, संजय बंदपट्टे, लोकेश यादव, अक्षय गंगेकर, नगरसेविका माधुरीताई धोत्रे, रुक्मिणीताई धोत्रे, साधनाताई धोत्रे तसेच प्रणिताताई घाडगे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनीही राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील १२ सदस्यांपैकी १० सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांची निवडणुकीतील बाजू अधिक मजबूत झाली असून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button