बार्शी येथील शिक्षकाची पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्या
बार्शी (बारामती झटका)
बार्शी येथील नाईकवाडी प्लॉटमध्ये आपल्या राहत्या घरी करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल मुंडे (वय ३८ वर्षे) रा. कळंबवाडी, ता. बार्शी, हल्ली रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी यांनी पत्नी तृप्ती शिक्षिका (वय ३५ वर्षे) मुलगा ओम (वय ११ वर्षे) यांचा खून करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे.
मुंडे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते कायम कोणत्यातरी विचारात असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. सदरची घटना ही बार्शी येथे घडलेली असल्याने या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. सदरील प्रकरणाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.