… अखेर शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जमीन विक्री लिलाव दहा कोटी दहा लाख रुपयाचा झाला

यशवंतनगर हद्दीतील अकलूज लगत असणाऱ्या नऊ एकर जमिनीची मूळ किंमत चार कोटी, लिलावामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहा कोटी ज्यादा मिळाले.

पुणे ( बारामती झटका )

शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट यशवंतनगर, ता. माळशिरस या ट्रस्टच्या सुमारे नऊ एकर जमिनीचा जाहीर विक्री लिलाव सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे – 2 या ठिकाणी दि. 28/10/2022 रोजी चार कोटी दहा लाख रुपयासाठी जाहीर लिलाव विक्री होणार होती. सदरची जमीन विक्री लिलावास मुदतवाढ मिळालेली होती. आज दि. 15/11/2022 रोजी दुपारी 02 वाजून 30 मिनिटे या वेळेमध्ये कार्यालयामध्येच बंद पाकिटातील अर्ज व निविदा ओपन केल्यानंतर सदरच्या जागेसाठी सात कंपन्या व व्यक्ती यांनी सहभाग घेतलेला होता. त्यापैकी तीन कंपन्या सर्व कागदपत्र व डीडी अद्यावत असल्याने सहभागी झाल्या.

त्यामध्ये शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हाॅस्पिटल ट्रस्टच्या जमीन विक्री लिलावत सहभाग कांगारू शटर्स प्रायव्हेट लिमिटेड, अशोका स्थापत्य प्रायव्हेट लिमिटेड, यू बी डेव्हलपर्स डॉ. भोसले. जमिनीच्या जाहीर लिलाव विक्रीमध्ये सहभागी झालेल्या कंपन्या माळशिरस तालुक्यातीलच होत्या. चार कोटीची जमीन दहा कोटी दहा लाख रुपये बोली यु बी डेव्हलपर्सचे डॉ. भोसले यांनी जाहीर लिलाव घेतलेला आहे. अशोका स्थापत्य यांनी सात कोटी पर्यंत बोली बोलले. कांगारू शटर्स श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते प्रकाशराव शामराव पाटील व ॲड. अभिषेक प्रकाशराव पाटील यांनी दहा कोटी पर्यंत बोली केली. त्यामुळे चार कोटीची जमीन दहा कोटी रुपयाला जाहीर लिलावातून विक्री झालेली आहे. त्यामुळे सहा कोटी रुपये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला लिलावामुळे अतिरिक्त कर्ज रूपाने बँकेमध्ये जमा होणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआई-वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – ह.भ.प. गणेश महाराज भगत
Next articleभारत जोडो यात्रेला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते अकोल्यात सहभागी होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here