चि. खंडू (नानासाहेब) माने, बचेरी आणि चि. सौ. कां. रत्नावली (भारती) खरात, पिलीव यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. देना शंकर माने, बचेरी आणि श्री. सतीश जयवंत खरात, पिलीव यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार…
बचेरी (बारामती झटका)
श्री. शंकर दाजी माने यांचे नातू व श्री. देना शंकर माने रा. बचेरी, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव खंडू उर्फ नानासाहेब आणि श्री. जयवंत हरी खरात यांची नात व श्री. सतीश जयवंत खरात रा. पिलीव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. रत्नावली उर्फ भारती यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. ४/१/२०२४ रोजी दुपारी १.५२ वा. शिवतीर्थ मंगल कार्यालय, पिलीव-पंढरपूर रोड, साळमुख, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे ही माने व खरात परिवाराच्या वतीने नम्र विनंती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.