अरेरेरेरे…. कुठे नेऊन ठेवलाय भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ वश्या मारुती भक्तांवर आली…
माळशिरस (बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामपंचायत यांनी तहसील कार्यालय माळशिरस यांच्याकडे अर्ज देऊन मौजे मारकडवाडी ता. माळशिरस येथील गायरान जमीन गट नंबर २३३ चे मोजणीची परवानगी मिळावी यासाठी दि. २०/१०/२०२२ रोजी अर्ज दिलेला होता. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय माळशिरस यांचेकडून उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस कार्यालय यांच्याकडे दि. २१/१०/२०२२ रोजी संबंधित गायरान गटाची मोजणी करणे आवश्यक असून शासकीय फी संबंधितांकडून भरून घेऊन नियमानुसार मोजणी करणे कामी आपले स्तरावरून योग्य ती कारवाई करावी, अशा प्रकारे पत्र दिलेले होते.
सदरच्या गट मोजणीसाठी त्याच दिवशी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत उपाध्यक्ष यांच्या नावे ६ हजार रुपयाचे चलन भरून सदर चलनाची प्रत दिलेली होती. तरीसुद्धा अद्यापपर्यंत उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदरच्या क्षेत्राची मोजणी केलेली नसल्याने श्री क्षेत्र वश्या मारुती मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन गुण्याबा गोरे जर बुधवारी १५ तारखेपर्यंत मोजणी नाही झाली तर गुरुवार दि. १६ मार्च २०२३ रोजी पासून कार्यालयाच्या पोर्चमध्ये सतरंजी, चादर, उशी घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
अरेरेरे… कुठे नेऊन ठेवलाय भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ मारकडवाडी ग्रामस्थ व वश्या मारुती भक्तांवर आलेली आहे. श्रीक्षेत्र वश्या मारुती ट्रस्टचे सचिव गजानन गुण्याबा गोरे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले. आजपर्यंत किती लोकांनी चलनं भरली आणि कोणाची मोजणी कधी केली, याची सर्व माहिती घेऊन उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ जनतेसमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng