उंबरे दहेगाव पंचवार्षिक निवडणुकीतील निरेश्वर बहुजन विकास आघाडी पॅनलचे मालन विठ्ठल नारनवर व सुखदेव यांना ढेकळे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
उंबरे दहिगाव ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार लक्ष्मीबाई ज्ञानदेव नारनवर व संजय अनंता ढेकळे यांनी निरेश्वर बहुजन विकास आघाडी पॅनलचे वार्ड क्रमांक एक मधील सर्वसाधारण स्त्री गटातील उमेदवार मालन विठ्ठल नारनवर यांना लक्ष्मीबाई नारनवर यांनी पाठिंबा दिला आहे तर वार्ड क्रमांक तीन मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार सुखदेव गेना ढेकळे यांना संजय अनंता ढेकळे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे.

उंबरे दहेगाव पंचवार्षिक निवडणुकीत नरेश्वर बहुजन विकास आघाडी पॅनलच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सुप्रिया भिमराव ठोंबरे या निवडणूक रिंगणामध्ये उभ्या आहेत त्यांचे कपबशी चिन्ह आहे. लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी उमेदवारांना व पॅनलला जाहीर पाठिंबा दिलेला असल्याने पॅनल मधील सर्वांच्या वतीने दोघांचे स्वागत करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng