कण्हेर गावचे प्रगतशील बागायतदार नामदेव माने पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांना पितृशोक.

कण्हेर ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार नामदेव श्रीपती माने पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे‌. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतम आबा माने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांचे ते वडील होते.

कन्हेर येथील यशोदा व नामदेव हे सर्व सामान्य शेतकरी कुटुंब होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी प्रपंच करून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेली आहे. त्यांना नऊ मुले व तीन मुली होत्या. त्यापैकी एक मुलगा वारलेला होता. सध्या आठ मुले व तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

माने घराण्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय व कुस्ती क्षेत्रात आणि नातू पै. वैभव व पै. शुभम यांनी नाव कमावले आहे. सध्या माने परिवार यांचे आर्थिक स्थिती व सर्व काही सुस्थितीत असताना अचानक माने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. स्व. नामदेव माने यांच्यावर गुरुवार दि. 6/10/2022 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.

स्व. नामदेव माने पाटील यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व माने पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleInfo Rooms for people who do buiness and Advertising
Next articleवाघोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here