कु. संस्कृती काळे हीचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

लवंग (बारामती झटका)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग, ता. माळशिरस, येथील विद्यार्थीनी कु. संस्कृती शरद काळे हिने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ मध्ये २९८ पैकी २६६ (89.26%) गुण प्राप्त केले. संस्कृती हिने माळशिरस तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक तर मुलींमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत तिची निवड झाली आहे. तिला वर्गशिक्षक श्री. शरद काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्कृतीने मिळवलेल्या यशाबद्दल माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी श्री. देशमुख साहेब, अकलूज बीटचे विस्तार अधिकारी श्री. नाचणे साहेब, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शाळा शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार.
Next articleसदाशिवनगरचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच वीरकुमार दोशी यांनी प्रकल्प संचालकाची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here