खासदार, आमदार, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्यावर दिपावली सणानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्र परिवार यांचेकडून शुभेच्छांचा वर्षाव

माळशिरस ( बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर लोकप्रिय खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, जनतेतील लोकप्रतिनिधी यांना सणांचा राजा दीपावली व साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दीपावलीचा पाडवा या दिवशी कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार यांचेकडून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाने शहरी भागासह ग्रामीण भागात थैमान घातलेले होते. संसर्ग पसरू नये, यासाठी शासनाकडून निर्बंध घातलेले होते. लॉकडाऊनच्या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून आरोग्य सुविधा कशा पुरवल्या जातील, याची दक्षता घेतलेली होती. उद्योग व्यवसाय व छोटेमोठे उद्योग बंद असल्याने अनेक लोकांच्या हाताला काम नव्हते. अशा कठीण परिस्थितीत लोकप्रतिनिधी यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिलासा होता. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केलेले होते. संसर्ग रोगापासून सुटका व्हावी, यासाठी सॅनिटायझर व मास्क अशा वस्तूंचे वाटप देखील करण्यात आलेले होते. कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव कमी झाल्यानंतर शासनाने निकष बदललेले होते.

कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव बर्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चाललेले आहेत. यंदाच्या वर्षी मनमोकळेपणाने नागरिकांनी दीपावली साजरी केलेली आहे. लोकप्रतिनिधी यांनी व्यक्तिगत व सार्वजनिक जनतेची कामे केलेली असल्याने दीपावली सणानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार यांचेकडून लाडक्या लोकप्रतिनिधींवक्ष शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यासोबत स्वराज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यासोबत सौ. संस्कृतीताई राम सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व लक्ष्मणासारखा सुखदुःखामध्ये पाठीशी असणारा बंधू रावसाहेब देशमुख, माळशिरसचे ज्येष्ठनेते गजानन बाळासाहेब पाटील या सर्व लोकप्रतिनिधींनी कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार यांचेकडून दीपावली सणानिमित्त शुभेच्छा स्वीकारून कार्यकर्त्यांची हितगुज व सुसंवाद साधलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleChoosing a Safe Board Management System
Next articleप्रगतशील बागायतदार नंदकुमार माने पाटील यांच्या माणुसकीवर ऊसतोड मजूर भारावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here