चि. प्रणितराज माळी, भोसे आणि चि. सौ.कां. रश्मी वाघमारे, कासेगाव यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. रामदास माळी आणि श्री. हनुमंत वाघमारे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार

पंढरपूर (बारामती झटका)

सौ. योगिता व श्री. रामदास नारायण माळी रा. भोसे (क.), ता‌. पंढरपूर यांचे सुपुत्र चि. प्रणितराज आणि सौ. सुमन व श्री. हनुमंत दगडू वाघमारे रा. कासेगाव, ता. पंढरपूर यांची सुकन्या चि.सौ.कां. रश्मी यांचा शाही विवाह सोहळा मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.२० मिनिटे या गोरज मुहूर्तावर रायगड लॉन्स, भोसे, ता. पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.

तरी या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनूनगर चे माजी संचालक बाळासाहेब राजाराम माने आणि श्री जानुबाई देवी विकास कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन रामदास नारायण माळी यांच्यावतीने करण्यात आले आहे. लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण व निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून शुभविवाह सोहळ्यास येण्याचे अगत्य करावे, अशी विनंती माळी व वाघमारे परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रपतींनी बदललेल्या १२ राज्यांचे राज्यपाल आणि १ केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल यांची यादी
Next articleमाळशिरस नगरपंचायतीचे महिला कबड्डी स्पर्धेमध्ये घवघवीत यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here