तिरवंडी गावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – आरोग्यमंत्री ना. डॉ. प्रा. तानाजीराव सावंत.

फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या समवेत युवा नेते शामराव बंडगर यांची सदिच्छा भेट…

तिरवंडी गावाला थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सुसंस्कृत व शिक्षित असणारे नानासाहेब वाघमोडे यांच्यामुळे प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटणार

पुणे (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत यांची फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ आण्णा वाघमोडे यांच्या समवेत तिरवंडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेते शामराव बंडगर यांनी सदिच्छा भेट घेऊन गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आवश्यकता व अत्यंत गरज असल्याची चर्चा करून ग्रामपंचायतचे मागणी पत्र व ठराव देण्यात आला. त्यावेळी तिरवंडी गावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न तातडीने मार्गे लावणार असल्याचे आरोग्यमंत्री ना. डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी सांगितले. सदरचे निवेदन देण्यात आले त्यावेळी ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, शामराव बंडगर, गोरडवाडीचे नेते मच्छिंद्र गोरड सर आदी उपस्थित होते.

तिरवंडी गावाला थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सुसंस्कृत स्वभाव, साधी राहणी, उच्च विचारसरणी, विकासाचा दूरदृष्टीकोण, शिक्षित असणारे नानासाहेब वाघमोडे गावाला सरपंच लाभलेले असल्याने गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना वाचा फुटणार आहे. गावामध्ये शिक्षण, स्वच्छता, आरोग्य व गावातील मुलभूत गरजा रस्ते, विज, पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून आदर्श गाव बनविण्याचा मानस आहे. मतदारांसमोर मतदानरुपी आशीर्वाद मागितलेला होता. भरघोस मतांनी नानासाहेब वाघमोडे यांनी निवडून दिल्यानंतर कार्याला सुरुवात केलेली आहे.

पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नितांत गरज आहे. तिरवंडी गावातील रात्री अपरात्री लोकांना माळशिरस किंवा अकलूज येथे वैद्यकीय उपचारासाठी जावे लागत आहे. अनेक लोकांची जाण्या-येण्याची अडचण होत असते. रात्री अपरात्री प्राथमिक उपचार करण्याकरता गावामध्ये उपकेंद्र असणे गरजेचे आहे. यासाठी ठराव करून ग्रामपंचायतचे डबल ग्रामपंचायत सदस्य युवानेते शामराव बंडगर यांनी माळशिरस तालुक्यातील विकासप्रिय नेतृत्व ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या सहकार्याने आरोग्य मंत्री ना. डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांची पुणे येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन प्राथमिक उपकेंद्राची मागणी केलेली होती. तात्काळ आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी लवकरच प्रश्न मार्गी लावून जनतेची अडचण सोडवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तिरवंडी गावचा अनेक दिवसाचा प्रलंबित व सर्व सामान्य जनतेच्या हिताचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकरमाळा एमआयडीसीला उजनीतून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा सर्वे करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश
Next articleभारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांतजी भारतीय यांचा सोलापूर जिल्हा दौरा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here