महाराष्ट्राचे हरित क्रांती ‘श्वतेक्रांतीचे जनक ॲड. डॉ. वसंतराव नाईक – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

कृषी क्षेत्रात कापुस एकाधिकार योजना, कृषि उत्पन बाजार समितीचे जनक, विनोबा भावे यांची भुदान चळवळ, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी गाई व म्हैस कर्ज, विविध फळपिके संशोधन व विकास, कृषी विद्यापीठ स्थापना, पाणी आडवा पाणी जिरवा उद्‌गाते, वसंत बंधारे व पाझर तलावाचे जनक, कृषि मंडळे स्थापना इत्यादी अद्वितीय काम त्यांनी केले व १९६५ साली येत्या २ वर्षात माझे राज्य स्वयंपूर्ण नाही झाले तर झाडाला मी स्वतः लटकवीन अशी शनिवार वाडा येथे जाहिर घोषणा करणारे ते मुख्यमंत्री होते. त्यांनी अन्नधान्य स्वयंपूर्णता करून दाखविले. असा हा महान शेतकऱ्यांचा कैवारी, पाठीराखा नेता होऊन गेला.

महाराष्ट्राचे हरित क्रांती व श्वेत क्रांतीचे जनक ॲड. डॉ. मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. श्री वसंतराव फुलसिंग नाईक ( राठोड ) यांचा जन्म दि. १ जूलै १९१३ रोजी गहूली ता. पुसद, जि. यवतमाळ येथे एका शेतकरी कुटूबात झाला. पहिल्यापासून संघटना कौशल्य आणि कृषि क्षेत्राची आवड असलेला सर्वसामान्य माणुस. शेती व शेतकरीबाबत असामान्य तळमळ व त्यासंबंधी कार्य यामुळे कृषी क्रांतीचे जनक झाले. महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा ४ सलग १२ वर्षे मुख्यमंत्री राहिले. मध्यप्रदेशचे पहिले उपमहसुल मंत्री महाराष्ट्राचे पहिले महसुल मंत्रीचा मान त्यांच्याकडे आहे. राज्य केंद्रीय बँकेचे संचालक, पुसद शेतकरी मंडळाचे पहिल्या अध्यक्षाचा मान मिळविला.

राज्यातील दारूबंदी उठवून शासनाचा महसुल वाढविला व दारु भेसळपासून बचाव केला. रोजगार हमी योजना ही मुहर्तमेढ रोवून १९७२ दुष्काळ पडला, त्यावेळी ५० लाख लोकांना रोजगार हमी योजना अंतर्गत काम देऊन अन्नधान्य पुरवठा करून भुकबळी पासून जनतेचे संरक्षण केले. महाराष्ट्रात देशातील प्रथमतः त्रिस्तरीय पंचायतराजचा उगम करून सत्तेचे विकेंद्रीकरण केले व जनतेच्या हाती सोपावून, प्रवाहात कार्यप्रणालीत आणण्याचे काम त्यांनी केले. अशा ह्या महान जानता राजा, शेतकऱ्यांचा कैवारी ‘हरितक्रांती’ श्वेत क्रांतीचे जनक सहकारची मुहर्तमेढ रोवणाऱ्या कृषी संशोधन केंद्र, विद्यापीठ जनक राजनिती तज्ञ, कृषीतज्ञ यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करून मानाचा मुजरा करून त्याचे ऋणी राहून जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करूयात !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाचे शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते शुभारंभ.
Next articleरिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धगधगता प्रवास…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here