मांडवे-कण्हेर-मांडकी-जळभावी रस्ता जिल्हा मार्ग करावा – युवानेते रितेशभैया पालवे पाटील.

आळंदी-पुणे-पंढरपूर व अकलूज-म्हसवड-कराड दोन मार्गाला जोडणारा रस्ता जिल्हा मार्ग केल्यानंतर व्यापारी वर्ग व दळणवळण सुरळीत होईल.

मांडवे ( बारामती झटका )

आळंदी-पुणे-पंढरपूर महामार्ग क्रमांक 965 ते मांडवे-कण्हेर-मांडकी-जळभावी राज्य मार्ग 145 अकलूज-म्हसवड-कण्हेर-कराड या मार्गाला मिळण्याकरता इजिमा 71 या मार्गाचा दर्जा वाढवून प्रमुख जिल्हा मार्ग करावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. सदाशिव साळुंखे साहेब यांना मांडवे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य युवानेते रितेश भैया बबनराव पालवे पाटील यांनी निवेदनातून मागणी केलेली आहे.

मांडवे-कण्हेर-मांडकी-जळभावी इजिमा 71 हा मार्ग आळंदी-पुणे-पंढरपूर व अकलूज-माळशिरस-म्हसवड-कराड रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. दळणवळणाच्या दृष्टीने व व्यापारी वर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. सदरच्या रस्त्याचा दर्जा वाढवून प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील मांडवे-कण्हेर-इस्लामपूर-मांडकी-जळभावी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्व वाहनधारक, शेतकरी, व्यापारी वर्ग यांना सदरच्या रस्त्याचा फायदा होणार आहे.

तरी संबंधित विभागाने सदरच्या रस्त्याचा दर्जा वाढवून लोकांची दळणवळणाची व व्यापारी वर्गाची सुविधा वाढवावी, अशा आशयाचे निवेदन युवानेते रितेश भैया पालवे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव श्री. सदाशिव साळुंखे यांना दिले आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होणे काळाची गरज – श्री सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशीरस
Next articleपालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची पानीव येथे सदिच्छा भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here